We should be proud of saffron : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दिली प्रतिक्रिया
Amravati जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव व धर्म विचारून त्यांना कलमा वाचायला लावले. ज्यांना कलमा वाचता आला नाही, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मुलाचे उदाहरण देत प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, “माझा मुलगा अजून लहान आहे. मी त्याला विचारले की जर तुला कलमा वाचायला सांगितले तर काय करशील? तेव्हा तो म्हणाला, ‘मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण कलमा वाचणार नाही.’ पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, तेव्हा हिंदू पर्यटकांना कलमा वाचायला लावले गेले. जे पर्यटक कलमा वाचू शकले नाहीत, त्यांच्यावर गोळी झाडली गेली. आमच्या हिंदूंनी गोळ्या खाल्ल्या, पण कलमा वाचला नाही.”
Ravindra Chavhan : रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आपल्याला पक्षानं मोठं केलय’
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “जे लोक भारतात राहतात पण देशाशी प्रामाणिक राहू शकत नाहीत, त्यांना येथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आपल्याला भगवा टीका लावून अभिमानाने जगायला हवे.”
पाकिस्तानच्या नेत्यांवर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या, “भुट्टो म्हणतो की जर सिंधू नदीचे पाणी थांबवले तर हिंदूंचे रक्त वाहेल. पण अख्ख्या पाकिस्तानमध्ये एवढी ताकद नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल. कारण भारतात नरेंद्र मोदी आणि अमित शहा नावाचे वाघ आहेत. आता आम्ही तुमचे केवळ पाणीच नाही तर दाणा देखील थांबवू.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास व्यक्त करत नवनीत राणा म्हणाल्या, “मोदीजी भुट्टोसारख्यांना धुळ चारतील. मला त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयपीएलच्या खर्चाइतका पाकिस्तानचा संपूर्ण जीडीपी आहे,” असेही त्या म्हणाल्या.