Naxalite Movement : चार जहाल महिला नक्षलवाद्यांचा खात्मा!

Police and Hawkforce killed four women Naxalites : पोलीस, हॉक फोर्सची संयुक्त कारवाई; ६२ लाख रुपयांचे होते बक्षीस

Gondia हॉकफोर्स, पोलिस आणि नलक्षवादी यांच्या झालेल्या चकमकीत चार जहाल महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांवर ६२ लाख रुपयांचे बक्षीस होते. चारही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. हॉकफोर्स व पोलिस जवानांनी नक्षलवाद्यांजवळून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल व दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जप्त केल्या.

गढी सूपखार वन परीक्षेत्रातील रौंदा फारेस्ट कॅम्प परिसरात सर्चिंग करीत असलेल्या जवानावर नक्षलवाद्यांनी अचानक फायरिंग सुरु केले. हॉकफोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांना आत्मसर्मपण करण्याचे आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी पोलीस जवानाच्या दिशेने सातत्याने फायरिंग सुरुच ठेवले. यानंतर हॉकफोर्स व पोलिसांनी फायरिंगनेच प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार जहाल महिला नलक्षवादी ठार झाल्या.

Rajiv Pratap Rudy : सुधीरजींसारखं काम करणारा नेता देशात दुर्मिळच

यामध्ये आशा कान्हा भोरमदेव (एरिया कमेटी कमांडर), शीला, रंजीता, लख्खे कान्हा भोरमदेव आदींचा समावेश आहे. या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या चारही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे.

नक्षल कमांडर आशा ही लगतच्या छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. मध्यप्रदेशच्या मंडला येथे कान्हा व्याघ्र प्रकल्प व छत्तीसगड राज्यातील कवर्धा जिल्ह्यातील भोरमदेव वन्यजीव अभयारण्यात ती एका नक्षल दलमचे नेतृत्व करीत होती. या दलमला ‘केबी’ असे म्हटले जात होते. १९ फेब्रुवारीला ती सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट परिसरात आपल्या १० ते १५ साथीदारांसह शस्त्र घेऊन आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर हॉकफोर्स व जिल्हा पोलिस दलाला या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

Rajiv Pratap Rudy : चंद्रपूर हे भविष्यात भारतातील नामांकित पायलट प्रशिक्षण केंद्र बनेल

५०० जवानांचे पथक!
गढी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्पजवळ १९ फेब्रुवारी रोजी ही चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी पळून गेले. या जंगलात हॉकफोर्स, पोलीस विभागाच्या १२ पथकातील जवळपास ५०० जवानांचा समावेश होता. यात चार महिला नक्षलवादी ठार झाल्या तर काही नक्षलवादी जखमी झाले आहेत. ते घनदाट जंगलाचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.