NCP Ajit Pawar : ताजबाग पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अस्मिता एल्गार’

Asmita Elgar of NCP Ajit Pawar group for beautification of Tajbagh bridge : NHAI अधिकाऱ्याने जागेवरच घेतले निवेदन, त्वरित कार्यवाही न झाल्यास चक्का जामचा इशारा

Nagpur : नागपूर-उमरेड रोडवरील ताजबाग दर्गा शरीफच्या प्रवेशद्वाराजवळील पुलाच्या खांबांचे भव्य सौंदर्यीकरण करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ‘अस्मिता एल्गार’ आंदोलन उभारले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख मेहबूब पठाण आणि निसार अली यांनी या लढ्याचे प्रभावी आयोजन केले.

ताजबाग हे विदर्भाचे एक प्रमुख धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र असून, दरवर्षी हजारो श्रद्धाळू येथे भेट देतात. तथापि, दर्ग्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या पुलाचे मोठे खांब या पवित्र स्थळाच्या सौंदर्यावर आणि प्रतिमेवर परिणाम करतात, असा नागरिकांचा आक्षेप आहे. शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे निवेदन देऊन स्पष्ट मागणी केली की, प्रवेशद्वारासमोरील पुलाच्या दोन्ही खांबांचे तातडीने आकर्षक सौंदर्यीकरण करून त्यावर ‘ताज नगरीमध्ये आपले स्वागत आहे’ असा भव्य फलक व रोषणाई करण्यात यावी.

Local Body Elections : निवडणुकीच्या रणांगणात महायुती सज्ज, नागपुरात झाली महत्त्वाची बैठक

NHAI अधिकाऱ्याने स्वीकारले निवेदन..
आंदोलनाच्या वेळी NHAI चे तांत्रिक अधिकारी मनोज गोडे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक प्रतिनिधींकडून स्वाक्षरींसह असलेले मागणीचे निवेदन जागेवरच स्वीकारले. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

जनतेच्या भावनांचा आदर करा..
शिष्टमंडळ भेटीनंतर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितले की, NHAI ने ताजबागच्या आध्यात्मिक ओळखीचा आदर करून त्वरित सौंदर्यीकरणाची लेखी हमी द्यावी. अन्यथा, नागरिक आणि कार्यकर्ते चक्का जाम आंदोलन छेडतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,

Amul mitkari : प्रवक्तेपदावरून हटवलेले अमोल मिटकरी आता राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक!

नेते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती..
या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश महासचिव तानाजी वनवे, महिला अध्यक्षा सुनीता येरने, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, मेहबूब पठाण, माधुरी पालीवाल, रुपेश रेवतवकर, राहुल कांबळे, निसार अली, राकेश घोसेकर, मोंटी गंडेचा, लक्ष्मीकांत पांडे, राजेश समर्थ, मुमताज बाजी, शहाजा बाजी, कनिजा बेगम, निखिल चापेकर, अविनाश पार्डीकर, जाकीर अली, दीपक लाडसे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसने सौंदर्यीकरणासोबतच धार्मिक स्थळांच्या अस्मितेचा सन्मान राखण्याचा मुद्दा ठळकपणे पुढे आणला असून NHAI आणि प्रशासनावर कार्यवाहीसाठीचा दबाव वाढला आहे.