Criminal case filed against Ajit Pawar’s MLA : हिंदू आक्रोश मोर्चा सभेत धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप
Akola राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम अरुण जगताप यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी अकोला मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
अहिल्या नगर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी १० ऑक्टोबर २०२५ रोजी सोलापूर येथे झालेल्या “हिंदू आक्रोश मोर्चा” सभेत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट धर्मीय समाजाबद्दल उत्तेजक व भडक विधान केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तसेच सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे अर्जात नमूद केले आहे.
Vanchit Bahujan Aghadi : कमीशनखोरी थांबवा, नाहीतर अधिकाऱ्यांना काळे फासू
या प्रकरणी अकोल्यातील समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जावेद जकरिया यांनी रामदासपेठ पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस प्रशासन आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधित आमदार सत्ताधारी गटातील प्रभावशाली नेता असल्याने कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे जकरिया यांनी वरिष्ठ फौजदारी वकील अधि. नजीब शेख यांच्या माध्यमातून थेट न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे.
न्यायालयाच्या रजिस्ट्रारांनी फौजदारी MCA खटला नोंदवून तो योग्य न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. या याचिकेत जावेद जकरिया यांनी आमदार जगताप यांच्यावर भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत पुढील कलमानुसार दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे — कलम १३६(१)(अ)(ब)(क), कलम १३६(२), कलम १९७(अ)(ब)(क)(ड), कलम ३५६(१)(२)(३).
Parth Pawar Case : कुटुंब आणि राजकारण वेगळे, विचारधारा महत्त्वाची
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, राज्यभर या खटल्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. खटल्यात जावेद जकरिया यांच्यावतीने अधि. नजीब शेख बाजू मांडत आहेत.








