Sharad Pawar’s Party to Contest on Its Own Strength : मित्र पक्षांनी पाळला नाही आघाडी धर्म
Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यादृष्टीने आमच्या पक्षाने तयारीही सुरू केली आहे. पण महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांकडून अद्यापही आघाडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी निरोप नाही आणि मागील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही. याही वेळी तसेच झाले तर इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी म्हटले आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही. आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभे केले होते. त्यांची जर आमच्यासोबत मिळून लढण्याची तयारी नसेल तर आम्हीही स्वबळावर तयार आहोत, असा सरळसरळ इशारा कुंटे पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी निवडणुकींमध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यासठी आग्रही आहो. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचे काम प्रामाणिकपणे केले व आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळेच रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.
Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !
आमचा मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा अनुभव चांगला नाही. गेल्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे, तेथे मित्र पक्षाला एक जिल्हा परिषद जागा देण्याचे ठरले होते. आमच्या पक्षाच्यावतीने आघाडी धर्म पाळून काँग्रेस पक्षासाठी जागा सोडल्या होत्या. परंतु काँग्रेसने त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आमच्यासोबत दगा केला आणि आम्ही एका जागी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार उभा केला, असे प्रवीण कुंटे यांनी सांगितले.
Farmers in crisis : धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका; आम्ही सोबत आहोत
महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून कोणतीही विचारणा होत नसल्याने इतर समविचारी पक्षांसोबत आम्ही चर्चा सुरू केली आहे. भाजपच्या विरोधात असलेली मते एकत्र राहणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम राहावी, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण त्यांनी ऐनवेळी नकार दिला, तर वेळेवर आमची गोची होऊ नये म्हणून आम्ही समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरू केली असल्याचे कुंटे पाटील म्हणाले. मतदार याद्यांवर विशेष लक्ष देण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांना केल्या असल्याचेही ते म्हणाले.