व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !

NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !

Criticism of NCP’s Jayant Patil Sparks Fierce Reaction in Nagpur : भाजप व त्यांच्या अनुयायांचे मनसुबे हाणून पाडणार

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात एका सभेत बोलताना गलिच्छ भाषेत टीका केली. याचा सर्व स्तरांतून निषेध होतो आहे. स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून निषेध व्यक्त केला. पडळकरांनी ज्या भाषेचा वापर केला. त्यानंतर उपराजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत.

व्हेरायटी चौकात गांधी पुतळ्यासमोर आज (२० सप्टेंबर) पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यानंतर पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, युवक नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Bapu Birus son : एवढा मोठा झाला का तू? अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही…”

लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील व मातृभक्त जयंत पाटील यांचा केलेला अपमान आम्ही कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही. आम्ही संयम पाळतो म्हणून तुम्ही षंढ समजत असाल तर तुम्ही मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहात. या विकृतीचा आम्ही निश्चित प्रतिकार करणार. भाजप आणि त्यांच्या अनुयायांचे मनसुबे सर्व शक्तिनीशी हाणून पाडणार, असा इशारा कुंटे पाटील यांनी यावेळी दिला.

St recruitment : एसटीमध्ये मेगाभरती! तब्बल 17,450 चालक, सहाय्यकांची भरती

आंदोलनात प्रामुख्याने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, सुरेश गुडधे पाटील. शैलेंद्र तिवारी, अफजल फारूकी, श्रीकांत अंबुलकर, राजेंद्र बडिये, रेखा कृपाळे, बबिता सोमकुंवर, अंजली साळवे, पिंकी शर्मा, संगीता खोब्रागडे, सुकेशनी नारनवरे, अविनाश गोतमारे, कपिल वानखेडे, नाना केने, योगेश धनुस्कर, यशवंत बारापत्रे, दिनेश साळवे, सुधीर मोहोड, मुक्तानंद वर्मा, चंद्रशेखर येवले, श्याम मंडपे, मोहन ठाकरे आदी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!