व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Sharad pawar : शिंदेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही मोदींच्या भेटीच्या तयारीत;...

NCP Sharad pawar : शिंदेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही मोदींच्या भेटीच्या तयारीत; महाविकास आघाडीत खळबळ

Sharad Pawar’s NCP MPs also prepare to meet Prime Minister Modi : पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्यामुळे चर्चांना ऊत

Mumbai उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीपाठोपाठ आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.

अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या भेटीवरून पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदारांनी पुन्हा भेटीची वेळ मागितल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. सुरुवातीला त्यांनी भाजप आणि एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक घेत चर्चा केली, त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या आणि एनडीएत सामील झालेल्या खासदारांच्या भेटी घेतल्या. मोदींच्या या वाढलेल्या राजकीय संवासामुळे दिल्लीच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Uddhav Thackery : ‘आम्ही थंड होणार नाहीत…’ उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

यातच शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी मोदींकडे भेटीची मागणी केल्याने यामागील नेमका उद्देश अद्याप गुलदस्त्यात असला, तरी राष्ट्रवादीच्या वतीने पंतप्रधानांच्या कार्यालयात देण्यात आलेले पत्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर मोदींची भेट घेतली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले गेले. आता पुन्हा एकदा नव्याने भेटीची वेळ मागितल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात नक्की काय शिजत आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

error: Content is protected !!