व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Sharad Pawar : नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी, मला कामातून थोडा...

NCP Sharad Pawar : नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी, मला कामातून थोडा ब्रेक घ्यायचा आहे

NCP Sharad Pawar nagpur district president pravin kunte expressed wish to step down : जिल्हाध्यक्ष कुंटे पाटलांनाही थांबायचे आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासमोरील अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे राजकीय पुनर्गठनाचे तर दुसरकीडे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे प्रयत्न सुरू असतानाच, आता नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी अनपेक्षित विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित नागपूर जिल्हा ग्रामीणच्या आढावा बैठकीत त्यांनी हे पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, प्रकाश गजभिये आणि सक्षणा सलगर यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा सादर केल्यानंतर कुंटे पाटील यांनी वैयक्तिक अडचणींचे कारण देत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थता दर्शवली. मला या पदावरून कार्यमुक्त करावे,अशी विनंती त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे केली.

Amravati Municipal corporation : अमरावती मनपात व्यापारी संकुल भाडेवाढीवर गदारोळ; उत्पन्न वाढीसाठी दरवाढीची मागणी

कुंटे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मी पक्ष सोडून जात नाहीये. गेल्या २५ वर्षांत प्रदेशाध्यक्ष पद सोडले तर पक्षातील सर्व महत्त्वाची पदे भूषवली आहेत. आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी. मला कामातून थोडा ब्रेक घ्यायचा आहे, याचा कोणीही चुकीचा किंवा वेगळा राजकीय अर्थ काढू नये.

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाच्या भवितव्यावरही सांशकता आहे. यात कुंटे यांच्या विनंतीने पक्षातील अस्वस्थाही या निमित्ताने समोर आली असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Akola Police : तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठव, दहा हजार रुपये देतो

शिंदे सेनेच्या ‘ऑपरेशन तुतारी’मुळे कार्यकर्त्यांमध्ये आधीच धाकधूक असताना, जिल्हा पातळीवरील मोठ्या नेत्याने पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असल्याची चर्चा आहे.प्रवीण कुंटे पाटील यांच्या या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात आणि नागपूर ग्रामीणची धुरा कोणाकडे सोपवली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!