New Nagpur City : ११,३०० कोटी रुपये खर्चून साकारले जाणार नवीन नागपूर !

New Nagpur to Rise with ₹11,300-Crore Investment : NMRDA आणि HUDCO यांच्यात करार, बीकेसीच्या धर्तीवर उभारणार शहर

Nagpur : राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासाला गती गेण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नवीन नागपूर आणि नव्या आऊटर रिंगरोडसाठी ११ हजार ३०० कोटी रुपयांच्या कर्जपुरवठ्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यांपैकी सहा हजार ५०० कोटी रुपये नवीन नागपूर प्रकल्पासाठी तर चार हजार ८०० कोटी रुपये आऊटर रिंगरोडसाठी वापरण्यात येणार आहे. १४८ किलोमीटर लांबीचा हा आऊटर रिंगरोड असणार आहे. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर नवे शहर उभारले जाणार आहे.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण NMRDA आणि हुडको Housing and Urban Developement Corporation Limited यांच्या झालेल्या करारानुसार नॅशनल कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड NBCC प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. नवीन नागपूर प्रकल्प एक हजार ७१० एकर क्षेत्रात उभारण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. मिहान व बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राजवळील गोधनी आणि लाडगाव परिसरात नव्या नागपूरची उभारणी केली जाणार आहे.

Pawar Vs Bawankule : जाहिराती कुणी दिल्या ते जाहीर करा !”

स्टार्टअप्स, एमएमएमई, तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी हे शहर आकर्षणाचे केंद्र ठरेल. याशिवाय या भागात अत्याधूनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली राबवली जाणार आहे. ही प्रणाली नागपुरात पहिल्यांदाच वापरली जाणार आहे. नागपूरचा विस्तार आणि आधुनिकीकरण वेगाने घडवून आणण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा टप्पा ठरणार आहे.