Security forces with a note saying Get free clothes shoes : ‘मोफत कपडे, बूट घ्या’ या चिठ्ठीने सुरक्षा यंत्रणा सतर्क
Mumbai : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली असतानाच मुंबईत सकाळी एकच खळबळ उडाली. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर फुटपाथवर बेवारस अवस्थेत एक बॅग आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेरील फुटपाथवर एका कोपऱ्यात काळ्या रंगाची सूटकेस संशयास्पदरीत्या ठेवलेली दिसून आली. सकाळच्या सुमारास एक तरुण ही बॅग तिथे ठेवून पुढे निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही बाब लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि परिसरात तात्काळ बंदोबस्त वाढवण्यात आला.
Pooja Khedkar : म्हणे नोकराचाच प्रताप; पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी अजब चोरी,
तपासादरम्यान या ग्रेईश रंगाच्या, भिंतीला टेकवून ठेवलेल्या बॅगेत एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीवर ‘Please take free shoes and cloth’ म्हणजेच बॅगेत कपडे आणि बूट असून ते कोणीही मोफत घ्यावेत, असा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, ही चिठ्ठी असली तरीही कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत खबरदारी घेत तपास सुरू ठेवला आहे.
ही चिठ्ठी कोणी लिहिली, मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर ही बॅग कोणी, कधी आणि का ठेवली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून अद्याप त्याची स्पष्ट उत्तरे समोर आलेली नाहीत. हे संपूर्ण परिसर शासकीय बंगल्यांचा असून येथे अनेक मंत्र्यांची निवासस्थाने असल्याने पोलिसांकडून या घटनेला गंभीरतेने घेतले जात आहे.
बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने बॅगची खालून वरपर्यंत सखोल तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये कोणतीही घातक किंवा संशयास्पद वस्तू आहे का, याची खात्री करून घेतली जात आहे. यासोबतच बॅगेतील चिठ्ठी आणि ती लिहिणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
Nitin Gadkari : गडकरींचा धडाका, तीन दिवसांत १६ बैठका, ९ जाहीर सभा
या घटनेनंतर खबरदारी म्हणून नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर तसेच आजूबाजूच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची सतर्कता आणखी वाढली असून, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.








