Nitesh Rane : महापौर ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा

Port Development minister campaigns for BJP nominees in Amravati : अमरावतीत भाजप उमेदवारांसाठी नितेश राणे उतरले मैदानात

Amravati अमरावतीत ‘खान, बान आणि पाना’ चालणार नाही. जर ते सत्तेत आले, तर सामान्य नागरिकांचे येथे राहणे कठीण होईल. अमरावती महापालिकेचा महापौर हा ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे विकास मंत्री तथा भाजपचे नेते नितेश राणे यांनी सोमवारी येथे केले.

अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बजरंग नगर मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. १५ जानेवारीला जर भगव्या रंगाला समर्थन दिले नाही, तर १६ तारखेला गलीगलीत हिरव्या रंगाचा गुलाल दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला. हिंदूंनी जागृत व्हावे, हिंदू राष्ट्र आणि हिंदूंच्या हितांना प्राधान्य द्यावे. हे हिंदू राष्ट्र असून येथे धमक्या चालणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.या सभेला निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री रणजित पाटील, आमदार राजेश वानखडे, किरण पातुरकर तसेच प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील भाजपचे उमेदवार उपस्थित होते.

Vanchit Bahujan Aghadi : वंचितचा ‘एकला चलो रे’ प्रयोग कितपत यशस्वी?

नितेश राणे यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, काही लोकांना मुस्लिम समाजाचा महापौर होईल, असे वाटते. मात्र तसे झाले, तर हिंदूंना टिळा लावता येणार नाही आणि समाज धोक्यात येईल. त्यामुळे मतदारांनी १५ जानेवारीला हिंदू राष्ट्राचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा पुनरुच्चार करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आठवण करून दिली.