Gadkari keeps his promise; Rs 27.5 crore fund approved for Akola : ग्रामीण आणि उपनगरातील दळणवळणाच्या सुविधा सुधारणार
Akola रामनवमी उत्सव आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधी जाहीर केला आहे. लोकसभा खासदार अनुप धोत्रे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र सरकारकडून एकूण २७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि उपनगरातील दळणवळणाच्या सुविधा सुधारणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत विदर्भामध्ये भाजपचे केवळ दोनच उमेदवार विजयी झाले. नागपूरमधून नितीन गडकरी, तर अकोल्यातून अनुप धोत्रे यांनी विजय मिळवला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे व नितीन गडकरी हे विदर्भातून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. संजय धोत्रे यांच्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांचे पुत्र अनुप यांच्याकडे आली आहे. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ते भाजपतर्फे विदर्भाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत.
तबरेचदा अनुप धोत्रे यांना गडकरींचे राजकारणातील शिष्यच मानले जाते. या शिष्याचा शब्द पाळत गडकरी यांनी माहामार्गाला जोडणाऱ्या अकोला जिल्ह्यातील काही प्रमुख मार्गांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये माझोड-बाबुळगाव-रामा मार्गावर रस्त्याची दुरुस्ती, नागद-सागद-हाता-हातरून-आगर-उगवा प्रजिमा या ९ किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती या कामांचा समावेश आहे. याच मार्गावर पुलांचे बांधकाम देखील होणार आहे.
शहर व उपनगरांतील जोडरस्ते आणि शेतकरी भागालाही याचा मोठा लाभ होणार आहे. डाबकी-अमानतपूर-ताकोडा-खडकी-सावंगी-मोहाडी-भोड इजिमा रस्ता,
मानसगाव-निंबा-डाबकी-रेल्वे फाटक ते राष्ट्रीय महामार्ग (SH-273) पर्यंतचा रस्त्याचाही यामध्ये समावेश आहे. निंभोरा-एकलारा-वडत-गोणापूर-येळवण रस्त्याच्या कामासाठी देखील प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. याच्या निधीचे तात्काळ वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले.
Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल, शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.