Nitin Gadkari : मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो याचा रेकॉर्ड करायचाय

Nitin Gadkari direct warning to chartered officers in Nagpur : नागपूरमध्ये नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना थेट इशारा

Nagpur: नागपूरमध्ये महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. आपल्या परखड आणि बेधडक वक्तव्याच्या शैलीत बोलताना गडकरी म्हणाले की, आतापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात चांगले रस्ते बांधण्याचं काम झालं आहे, मात्र आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, किती अधिकाऱ्यांना निलंबित करतो याचा रेकॉर्ड माझ्याकडून झाला पाहिजे. यासाठी मी देशभरात हात धुवून मागे लागलो आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमावेळी गडकरी यांनी नागपूर महापालिकेतील कामकाजावरही भाष्य करत अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर जोरदार टीका केली. जनतेला चुकीसाठी शिक्षा होते, मग जे अधिकारी नियमानुसार वेळेत काम करत नाहीत, त्यांचं काय करायचं, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेशी प्रामाणिक राहणं ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असून गोड-गोड बोलतात म्हणून कोणाचं ऐकायचं काही कारण नाही, जनता हीच खरी मालक आहे आणि जनतेची कामं झालीच पाहिजेत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलणार, कोणत्या भागातून जाणार नवा मार्ग?

नितीन गडकरी यांनी यावेळी नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनाही चिमटा काढला. मी गमतीने म्हणतो की नागपूर मनपा आयुक्तांना माझ्याविरोधात पुढील लोकसभा निवडणूक लढायची आहे, कारण नागपूरमध्ये इतका सहहृदयी आयुक्त यापूर्वी कधीच आला नाही. इतर ठिकाणी नेते अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकारी ते काढतात, मात्र इथे उलट परिस्थिती आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलणार, कोणत्या भागातून जाणार नवा मार्ग?

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, जी व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांना न्याय देत नाही, ती व्यवस्था उखडून फेकली पाहिजे. मी काम केलं नाही तर मला मुर्दाबाद करण्याचा अधिकार जनतेला आहे, असे म्हणत आपण नागपूरच्या जनतेसाठीच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल आणि द्रुतगती मार्गांच्या माध्यमातून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या नितीन गडकरी यांनी अधिकारी आणि ठेकेदारांनी कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा केल्यास कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यावेळी दिला. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, येत्या काळात कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.