A paid campaign is being run against me, says Gadkari : माझ्याविरोधात पेड कॅम्पेन चालवलं जात आहे, गडकरी
New Delhi : सोशल मीडियावर ई 20 फ्यूलविरोधात होत असलेल्या टीकेवर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “ही टीका कुठल्याही टेक्निकल प्रॉब्लेममुळे नाही, तर श्रीमंत आणि शक्तिशाली पेट्रोल लॉबीने पसरवलेला प्रोपेगेंडा आहे. माझ्याविरोधात पेड कॅम्पेन चालवलं जात आहे,” असा आरोप गडकरींनी केला. ते फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आयोजित ऑटो रिटेल कॉन्क्लेवमध्ये बोलत होते.
ई 20 फ्यूल हे ८०% पेट्रोल आणि २०% इथेनॉलचे मिश्रण आहे. सरकार याकडे ग्रीन एनर्जी ट्रांजिशनसाठी महत्त्वाचे पाऊल मानते. मात्र, सोशल मीडियावर या फ्यूलमुळे कार्सचं मायलेज कमी होईल आणि इंजिनवर परिणाम होईल, असे दावे होत आहेत. गडकरींनी या दाव्यांना फेटाळून लावत “हे तंत्रज्ञान भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाईल आणि प्रदूषण कमी करण्यात मदत करेल,” असं सांगितलं.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानेही स्पष्ट केलं आहे की, ई20 फ्यूलमुळे मायलेजवर होणाऱ्या परिणामाबाबत अतिशयोक्ती केली जात आहे. ई-0 कडे परत जाणं भारताच्या प्रगतीला मागे ढकलणार असल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.
Fund allocation : तीन वर्षांत मराठा समाजाला 25 हजार कोटी ओबीसींना 25 वर्षात किती ?
गडकरींनी सांगितलं की, भारत नवीन बॅटरी तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहे. देशातील स्टार्टअप्स सोडियम आयन, लिथियम आयन, झिंक आयन आणि ॲल्युमिनियम, आयर्न बॅटरीवर संशोधन करत आहेत. याशिवाय जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमधून रेयर अर्थ मेटल्स आणि इतर महत्त्वाचे धातू मिळवता येऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
Maratha reservation : खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर औचित्य संपेल
“काही वर्षांपूर्वी भारत सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होता. त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पण आता भारतात चिप निर्मिती सुरु झाली आहे. यामुळेच भविष्यात इंधन आणि बॅटरी सेक्टरमध्येही आत्मनिर्भरता दिसेल,” असं गडकरी म्हणाले.
सध्या पेट्रोल-डिझेल वाहनांची मागणी कमी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “ऑटोमोबाइल प्रोडक्शनमध्ये दरवर्षी १५-२० टक्के वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार खूप मोठा आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल वाहनांची विक्री सुरु राहील, मात्र पर्यायी इंधन आणि तंत्रज्ञान ही भविष्यासाठी गरजेची दिशा आहे,” असं गडकरी म्हणाले.
_____








