Nitin Gadkari : सरकारी अधिकाऱ्यांना आदिवासी भागात किमान पाच वर्षे नोकरीची सक्ती हवी

Government officials should be required to work in tribal areas for at least five years : गडकरी म्हणाले, बदल्यांसाठी आमदारांचीच पत्रे येतात

Nagpur आदिवासी भागांमध्ये सरकारी नोकरी करायला कुणीच तयार नाही. कुठलाही जिल्हा चालतो, पण गडचिरोलीसारखा जिल्हा चालत नाही. पोस्टींग झाले, की आमदारांचीच बदल्यांसाठी पत्रे येतात. खरं तर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदिवासी भागात किमान पाच वर्षांची नोकरी करणे बंधनकारकच करायला हवे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

प्रकाश खेळकर यांच्या आदिवासी समाजाचे जीवन व लोकसंस्कृतीवर आधारित ‘दि सायलेंट ट्रायबल्स ऑफ बस्तर’ या पुस्तकाचे प्रकाशन गडकरींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासीबहुल भागांचा विकास व्हायचा असेल तर तिथे काम करण्याची तयारी ठेवावी लागेल, असंही गडकरी म्हणाले.

Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे ‘एप्रिल फुल’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

छत्तीसगड आणि गडचिरोलीमध्ये आज रस्ते उत्तम झालेत. गडचिरोलीत तर उत्तम दर्जाचे लोहखनीज आहे. याठिकाणी आता सात हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. गोंडवाना विद्यापीठ झाले आहे. रोजगाराभिमूख शिक्षणाची सोय होत आहे. अशात आदिवासींची संस्कृती आणि या भागांमधील पर्यावरणाचे संवर्धन करून त्यांचे जीवनमान सुधारण्याची आणि आदिवासी समाजाचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्याची नितांत गरज आहे, असंही गडकरी म्हणाले.

प्रेस क्लब येथे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, लेफ्ट. जनरल विनोद खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘आदिवासी भागात सामाजिक-आर्थिक परिवर्तन खूप आवश्यक आहे. या ठिकाणी विषमतेतून संघर्षाचे बिजारोपण झाले. पण ही विषमता संपवायची असेल तर आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार मिळणे आवश्यक आहे. यातूनच आदिवासी कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. संस्कृती आणि पर्यावरणाचे संवर्धन करून आदिवासींचे जीवनमान सुधारले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.’

Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !

छत्तीसगडमध्ये बस्तर आणि गडचिरोलीतील आदिवासी क्षेत्रात फिरण्याची मला बरीच संधी मिळाली. या भागात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण आहे. पण रस्ते उत्तम झाले आहेत. उद्योग येऊ लागले आहेत. १९९५ ते २००० या कालावधीत राज्यात मंत्री असताना मला आदिवासी गावांना मजबूत रस्त्यांनी जोडता आले, असंही ते म्हणाले.