Nitin Gadkari : नांदुरा उड्डाणपुलासाठी आमदारांचे गडकरींना साकडे

mla-chainsukh-sancheti-demands-nandura-flyover-nitin-gadkari : शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा

Nandura नांदुरा शहरातील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार चैनसुख संचेती यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

नांदुरा रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासूनची गंभीर समस्या बनली आहे. रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर काही मिनिटांतच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. परिणामी व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी तसेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक वेळा रुग्णवाहिकांनाही या कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.

Ajit Pawar NCP : जिल्हाध्यक्षांना जाग आली, अचानक ५१ लोकांची कार्यकारीणीच जाहीर केली!

मात्र प्रस्ताव, प्रशासकीय मंजुरी आणि तांत्रिक प्रक्रियांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प वर्षानुवर्षे कागदोपत्रीच अडकून राहिल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संचेती यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेत हा प्रश्न थेट केंद्र सरकारसमोर मांडल्याने या प्रकल्पाला नव्याने राजकीय गती मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Rohit Pawar rahul gandhi : रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधीना भेटले

नांदुरा परिसरात ‘भाऊ’ म्हणून ओळख असलेल्या संचेती यांनी हा प्रश्न आक्रमकपणे मांडल्यामुळे आता उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात चालना मिळेल का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागला, तर नांदुराच्या विकासाला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.