Nitin Gadkari : नगरसेवकाने काम केलेच पाहिजे, पण तो तुमचा पाळीव प्राणी नाही!

Nitin-gadkari-corporators-are-not-your-pet-animal: तक्रार करणाऱ्यांना नितीन गडकरींनी सुनावले

Nagpur मागील कार्यकाळात अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रभागातच फिरकले नव्हते. ते सर्व निष्क्रिय होते अशा तक्रारी होत्या. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने अशा तब्बल ५६ नगरसेवकांचे तिकीट कापले होते. असे असतानाही पुन्हा एकदा नगरसेवक दिसत नाही अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. याची दखल घेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नगरसेवक तुमच्या बापाचे नौकर नाहीत अशा शब्दात तक्रार करण्याऱ्यांचा समाचार घेतला.

नगरसेवक हे काही पाळीव प्राणी नाहीत. ते तुम्हाला दिसलेच पाहिजे. याचा अर्थ नगरसेवकाने कामच करू नये असा होत नाही. नगरसेवक म्हणून निवडून आला असाल तर नगरसेवकांनी कामे केलीच पाहिजे. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. मात्र नगरसेवक रोज दिसलाच पाहिजे हा कोणाचा हट्ट असेल तर तो योग्य नाही असेही गडकरी म्हणाले.

Sbl energy company blast : नागपूर एसबीएल एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई

नागपूर महापालिकेचा स्थापना दिन आणि अमृत महोत्सवानिमित्त आज सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयात सर्व माजी महापौर, उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, नगरसेवक बनणे सर्वात कठीण काम असते. त्याला सकाळी उठल्यापासूनच गडर, नाल्या, साफ सफाईकडे लक्ष द्यावे लागते. मी त्याबाबत सुदैवी ठरलो. मी थेट आमदार झालो. जे नगरसेवक झाले त्यांनी त्यांच्या पक्षाकडे तिकीट मागितले होते. लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ते नगरसेवक झाले. आता त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना जनतेची कामे करावीच लागणार आहे. नागपूर शहराच्या विकासात सर्वांचेच योगदान आहे. आजा पिण्याच्या पाण्याची समस्या शहरात राहिली नाही.

उत्तम उद्याने आणि रस्ते शहरात झाले आहेत. आता काही चौकांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार वाढले आहे. त्याकडे महापालिकेने आता लक्ष द्यावे. मालमत्ता करात वाढण्यात येणार असल्याचे मला समजले. कर वाढवायला हरकत नाही. मात्र जे प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यावर भार दिला जातो. जे कर भरत नाही, पाणी पट्टी भरत नाही आधी त्यांच्याकडून सर्व कराची रक्कम वसूल करण्याची सूचना गडकरी महापालिकेच्या प्रशासनाला केली.

Jai pawar : “विमान हवेत अन् पायलटच्या सीटवर मालक झोपला”

काही वस्त्यांमध्ये यापूर्वी एक मजली घर होते. आता पंचवीस पंचेवीस मजल्याच्या इमारती तिथे उभ्या झाल्या आहे. पाच ऐवजी पाचशे कुटुंब एकाच इमारतीत राहायला आले आहेत. दुसरीकडे करदात्यांच्या यादीत वाढ होताना दिसत नाही. अशा लोकांकडे बोट दाखवून सर्वांना कराच्या अखत्यारित आणावे अशी सूचना यावेळी नितीन गडकरी यांनी केली.