Nitish Kumar : नितीश कुमार यांनी रचला नवा विक्रम; मोदींनी केले अभिनंदन !

Swearing in as the Chief Minister of Bihar for the tenth time : दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Patna : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए–भाजप आघाडीनं मिळवलेल्या विक्रमी बहुमताच्या पार्श्वभूमीवर आज पाटण्यात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास रचला.

243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, कारण या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून मोठा भाऊ ठरला होता. अखेर सर्व चर्चांना विराम देत एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली.

Thombre vs Khandalkar : रुपाली ठोंबरेंची माधवी खंडाळकरांना अब्रुनुकसानीची नोटीस

पाटण्याच्या गांधी मैदानात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक दिग्गज नेते या सोहळ्यास उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर मोदींनी मंचावर येऊन नितीश कुमार यांना जवळ येऊन शुभेच्छा दिल्या.

बिहारमध्ये निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या असल्या तरी भाजपने मिळवलेल्या सर्वाधिक जागांमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत महाराष्ट्रासारखा ‘पॅटर्न’ राबवला जाणार का, याबाबत मोठी चर्चा होती. महाराष्ट्रात निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवून सुद्धा भाजपने अधिक जागा जिंकल्या आणि परिणामी मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर गेले.

Thackeray alliance : मनसे – ठाकरे गटाच्या जागावाटपाचा चर्चा निर्णायक टप्प्याकडे

बिहारमध्येही अशीच राजकीय गणिते जुळतील की नितीश कुमार यांनाच पुन्हा संधी मिळेल, याकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर एनडीएने स्थैर्य आणि अनुभवाला प्राधान्य देत नितीश कुमार यांच्याच हाती सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतला.

दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत त्यांनी स्वतःचा जुना विक्रम मोडीत काढला असून बिहारच्या राजकारणात स्वतःची ठाम छाप पुन्हा अधोरेखित केली आहे.

——————–