Both NCPs on the front foot in seat sharing : शरद पवार गट म्हणतो, काँग्रेस मोठा भाऊ; अजित पवार गट ४० जागांवर ठाम
Nagpur नागपूर महानगरपालिकेची यापूर्वीची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. आता आठ वर्षांनी निवडणूक होईल. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे यंदा जागावाटपात चांगलाच गोंधळ होणार आहे, हे निश्चित आहे. मात्र, अद्याप निवडणूकच जाहीर झालेली नसली तरीही महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही राष्ट्रवादी जागावाटपांसाठी फ्रंट फुटवर आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चाळीस जागांची मागणी केली आहे. पण मोठा भाऊ म्हणून काँग्रेसनेच नेतृत्व करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील ४० जागांची मागणी करून पेच वाढवला आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. दरम्यानच्या काळात तर राष्ट्रवादीत बोटावर मोजण्याएवढे नेतेच उरले आहेत. कार्यकर्त्यांची बोंबच आहे. अश्यात दोन्ही राष्ट्रवादींचा चाळीस जागांवरील दावा कितपत मान्य होतो, हे लवकरच कळेल.
Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena : उड्डाणपुलाचे बांधकाम थर्डक्लास, शिवसेना आक्रमक!
आगामी महानगरपालिका निवडणूकीत महाविकासआघाडी एकत्रित लढणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिका निवडणुकीची चाहुल लागताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणुकीत काँग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी पक्षातर्फे गेल्या निवडणुकीच्या आधारावर ४० संभाव्य जागांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्ष चर्चेत दोन पावले मागे सरण्याचीही तयारी आहे. काँग्रेसने सन्मानजनक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसनेही मोठा भाऊ म्हणून तशी तयारी दर्शवावी अशी भूमिका शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी मांडली आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. २०१२ मध्ये राष्ट्रवादीने दोनच जागा जिंकल्या, तर २००७ मध्ये ८ नगरसेवक निवडून आले होेते. या तीनही निवडणुकीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमाकांवर राहिलेल्या जागांचा तसेच गेल्या पाच वर्षांत पक्षाची स्थिती बळकट झालेल्या जागांचा अभ्यास करून ४० जागांची यादी तयार करण्यात आली आहे.
Harshwardhan Sapkal : अचानक युद्धबंदी जाहीर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण?
अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पूर्व विदर्भाचा कार्यकर्ता मेळावा शुक्रवार, दि. २३ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी यासंदर्भातील माहिती देताना महायुतीमध्ये ४० जागांवर लढण्यास राष्ट्रवादी ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मेळाव्यातून कोणती भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.