Breaking

NMRDA : मुख्यमंत्र्यांनी सांगितले, कसे असेल नवीन नागपूर !

The Chief Minister Devendra Fadanvis said, How will the new Nagpur be like : एनएमआरडीएच्या या प्रकल्पाला तत्वतः मान्यता

Nagpur : नागरिकांच्या भविष्यातील गरजांना अनुकूल आणि खोदकाम विरहित असे नवीन नागपूर शहर साकारले जाणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण NMRDA यांच्याद्वारे हा प्रकल्प संकल्पित करण्यात आला आहे. एनएमआरडीएच्या हद्दीत नवीन नागपूर हे शहर तयार होणार आहे. कसे असे नवीन नागपूर, हे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवीन नागपूर संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन नागपूरमध्ये स्टार्टअप्स, एमएमएमई, तंत्रज्ञान कंपन्या व आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही नवीन नागपूरचे मुख्य वैशिष्य्ट असेल. प्लग अॅंड प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कुलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू व टेलिकॉम यांसारख्या सर्व मुलभूत व नागरी सुविधा एकत्रिपणे पुरवेल.

Pankaja Munde : समुपदेशनाने होणार पशुसंवर्धन विभागातील ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या !

खोदकाम विरहीत व भविष्यातील गरजांना अनुकूल असे हे शहर असणार आहे. या प्रकल्पामुळे आयटी, वित्त व सेवा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. एकात्मिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक सुलभता व मजबूत प्रशासन मॉडेल यांच्या जोरावर हे शहर नागपूरचे आर्थिक महत्व अधोरेखीत करणार आहे. एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना हा प्रकल्प पूर्णपणे हाताळणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, त्या शेतकऱ्यांना वीज बिलात सलवत नाही

यासंदर्भात मुंबईत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. गोविंदराज, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बगळन, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त संजय मीना, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी आणि नागपूर जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.