Not wearing seat belt, a fine of 55 lakh 23 thousand rupees in Gondia : गोंदिया वाहतूक पोलिसांची वर्षभरात ५५२३ लोकांवर कारवाई
Gondia सीटबेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्यांवर Gondia वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. ५५२३ जणांनी सीट बेल्ट लावला नाही, म्हणून त्यांच्याकडून ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. चारचाकी चालविताना सीट बेल्ट लावणे अत्यंत सोपे आहे. पण निष्काळजीपणाचा दंड भरण्यात लोकांनी समाधान मानले, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी अनेक नवे नियम आले, कायदे आले. पण नियम मोडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही. मागील वर्षात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न लावणाऱ्या हजारो जणांवर कारवाया केल्या आहेत. १३७१ जणांकडून तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर अनेकांवर गुन्हेही दाखल केले आहेत.
Ambazari Road Construction : अर्धा मार्ग बंद होणार, पूर्ण मार्ग खुला होणार!
वाहतूक नियम तोडणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. अनेकदा विशेष मोहीमही राबविली जाते. ३१ डिसेंबरच्या रात्री जिल्हाभरात वाहनचालकांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. नियम तोडणाऱ्या वाहनधारकांकडून दंडही आकारला जातो. मागील वर्षात विशेष मोहीम व नियमित कारवाया केल्याने कोट्यवधींचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे पालन केले तर कारवाई टळू शकते. मात्र यानंतरही कित्येक वाहन चालक आपल्याच आवात राहतात. परिणामी त्यांना पोलिसांच्या कारवाई पुढे जावे लागते. विना हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, गाडी चालविताना फोनवर बोलणे, कागदपत्र नसणे, अवैध प्रवासी वाहतूक आदींबाबत कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाया केल्या जातात. जे मद्यपान करून वाहन चालवितात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. वाहतूक नियम पाळण्याची गरज आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे धोकादायक आहे, हे माहिती असूनही कित्येक जण स्टाइल दाखवत मोबालवर बोलतात. अशा ३२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.