Laxman Hakes post creates a stir : लक्ष्मण हाके यांच्या पोस्टनंतर खळबळ
Mumbai : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टनं मोठी खळबळ माजवली आहे. हाके आंदोलन पुढे नेणार की मागे घेणार, याबाबत आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या भावनिक पोस्टनंतर त्यांनी आपली प्राथमिक प्रतिक्रिया व्यक्त केली असून, दैत्यानांदूर जि. अहमदनगर येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एका वृत्त वाहिनीला बोलताना हाके म्हणाले, “गेल्या चार-पाच दिवसांत काही घटना घडल्या ज्यामुळे मी थोडासा निराश झालो आहे. मात्र, मला राजकारण करायचं नाही. माझं ध्येय म्हणजे आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा आणि जीआर रद्द व्हावा, हे महत्त्वाचं आहे. माझा फोटो कुणी काढेल, पण लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही.”
Help for farmers : शेतकऱ्यांना तातडीची मदत थेट खात्यात जमा होईल !
ते पुढे म्हणाले, “मला शत्रूंपासून आणि स्वकियांपासूनही त्रास होत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात मी लढत राहणार आहे. कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. माझ्या भावनिक पोस्टनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मला फोन आला. मात्र, छगन भुजबळ यांचा फोन आलेला नाही. कदाचित ते बिझी असतील.”
आपल्या पोस्टमध्ये हाके यांनी लिहिलं आहे की, “मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र यावेत म्हणून, आपले हक्क टिकावेत म्हणून. मी मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे. माझ्याकडे मोठे स्टेज नाही, बॅनर नाही, पण तरीही तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. लाखो माणसं जोडली, पण शत्रूंची संख्याही वाढली. आता मात्र सहन होत नाही.”
Amravati Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची जोरदार मोहीम
हाके यांनी पुढे जाहीर केलं की, “उद्या दैत्यानांदूर येथील ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मी आंदोलनात राहीन किंवा नसेनही, पण आजवर दिलेल्या साथीसाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो.” राज्यातील आरक्षणाच्या वादळात हाके यांची ही पोस्ट आणि भूमिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.