An allegation of deliberately creating confusion over the issue of reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केल्याचा आरोप
Shegao राज्यातील आरक्षण प्रश्नावर जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवला जात आहे,” असा गंभीर आरोप ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी रविवारी केला. सत्ताधाऱ्यांनी तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. जातनिहाय जनगणना हाच आरक्षण प्रश्नावरचा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेगाव येथील हॉटेल विघ्नकर्ता इन येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबीर पार पडले. या अधिवेशनात सुनील शेळके अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
Anish Damania : मिस्टर दमानियांची सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती !
२०१८ मध्ये स्थापन झालेल्या संघटनेच्या कामगिरीचा आढावा घेताना शेळके म्हणाले की, “ओबीसी समाजाने खरा शत्रू व खरा मित्र कोण हे ओळखले पाहिजे. संघटना २४ तास लढणारी अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी आम्ही राज्यभर परिषदांचे आयोजन करणार आहोत,” अशी घोषणा त्यांनी केली.
युनिटी ऑफ मुलनिवासी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी अभ्यासक कमलकांत काळे यांनी “ओबीसी आरक्षण : सामाजिक लढा व आताची परिस्थीती” या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले.
ते म्हणाले, “आरक्षण म्हणजे पहिल्या पंक्तीत बसून जेवण्याची संधी नव्हे, तर पंगत वाढवण्याची व्यवस्था होय. मात्र अदृश्य शक्तींनी आरक्षणाविरुद्ध अडथळे निर्माण केले. आज मार्केट, मनी आणि मीडिया या तिन्हींचा वापर करून आधुनिक मनुवाद पुढे आणला जात आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
जीएसटी विभागाचे माजी सहायक आयुक्त व एससी, एसटी, ओबीसी कर्मचारी वेल्फेअर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थुल यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत “ओबीसी समाजातील युवकांनी अपयशाने खचून न जाता निर्भयपणे लढा उभारला पाहिजे” असे आवाहन केले.
मंडल आयोग अहवालाची घोषणा (७ ऑगस्ट १९९०) आणि सत्यशोधक समाजाची स्थापना (२४ सप्टेंबर १८७३) या दोन ऐतिहासिक दिवसांच्या स्मरणार्थ हे अधिवेशन घेण्यात आले. अधिवेशनाला राज्यातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.
Cancer treatment : प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा !
संचलन राज्य सल्लागार शिवशंकर गोरे यांनी केले. सरचिटणीस राम वाडीभस्मे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बुलडाणा जिल्हा व राज्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारीही या अधिवेशनाला उपस्थित होते.