OBC Reservation : आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका, आरक्षणासाठी लढू

Chhagan Bhujbal’s appeal to OBC brothers : छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

Mumbai: मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजात निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी जीआर काढला आणि हैद्राबाद गॅझेट लागू केले. मात्र, या निर्णयामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून, त्यांच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नुकतेच ओबीसी समाजाला मोठं आवाहन केलं. “आत्महत्येच्या वाटेला अजिबात जाऊ नका. काळजी करू नका. आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कोर्टात पाच अर्ज दाखल केले आहेत आणि सक्षम वकील आपल्याकडून लढत आहेत. त्यामुळे विजय आपलाच होईल,” असे भुजबळ म्हणाले.

Anganwadi worker : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड;

भुजबळांनी पुढे सांगितले की, “दोन्ही आघाड्यांवर आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कुणीही हताश होऊ नये. उलट जिथे शक्य असेल तिथे सभा घ्या, मोर्चे काढा आणि लोकशक्ती दाखवा. आम्ही आता बीडमध्ये सभा घेत आहोत. ओबीसींच्या हक्कांसाठी प्रचंड महासागर निर्माण करूया.”

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली सडकी झाडे

ओबीसी समाजाच्या चळवळीत आता दलित, आदिवासी, मागासवर्गीयांचा देखील पाठिंबा असल्याचे भुजबळांनी सांगितले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत 340 आणि 341 कलमांतर्गत ओबीसीमधील छोट्या जातींसाठी तरतूद केली आहे. त्यामुळे आपला लढा योग्य आहे. महात्मा फुले परिषद तसेच इतर संघटनाही जिल्ह्याजिल्ह्यात सभा, मोर्चे, निवेदने आणि उपोषणांद्वारे लढा देत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Demand loan waiver : शेतकरी उद्ध्वस्त; पीएम केअर फंडातून कर्जमाफीची मागणी !

सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे भुजबळ सदस्य आहेत. मात्र, मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरनंतर भुजबळ नाराज असून, ओबीसींच्या हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.