Meetings in Mumbai, preparations for statewide Sangharsh Yatra : मुंबईत बैठका, राज्यव्यापी संघर्ष यात्रेची तयारी
Mumbai : मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारच्या जीआरबाबत साशंक असलेल्या नेत्यांनी ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. यानिमित्ताने ओबीसी नेते एकसष्ठ आहेत. या माध्यमातून, राज्यव्यापी संघर्ष यात्रेची तयारी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाज अस्वस्थ आहे. सरकारच्या वतीने ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नाही हे सांगण्यात येत असले तरी ओबीसी समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. यातच ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
Yelgaon Dam : शेतकरी चढला ३५० फूट उंच टॉवरवर, प्रशासन हादरले!
दरम्यान, बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथे झालेल्या सभेत ओबीसी नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या सभेत नवनाथ वाघमारे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर “बीडचा बेवडा आमदार” अशा शब्दांत टीका केली तर बजरंग सोनावणे यांचा “चंदनचोर” असा उल्लेख केला.
या सभेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. पवार साहेबांनी मंडल यात्रा दोन दिवसांत थांबवली होती, आमच्या नादाला लागू नका असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मुंडे साहेबांची आठवण करून देत महाराष्ट्र आज त्यांच्या अभावाची किंमत मोजत असल्याचे म्हटले. ओबीसी संघर्ष यात्रा जाहीर करण्याची घोषणा देखील त्यांनी केली.
भोगलवाडीतील सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. “महाराष्ट्र बघेल की भोगलवाडीत किती गर्दी झाली,” असे सांगत हाके यांनी ओबीसींच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसींचा पूर्ण विकास अजून झालेला नाही, जातीवर्चस्वाची भाषा आम्ही कधी केली नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
नागपुरात झालेल्या बैठकीनंतर या दोन महत्त्वाच्या सभा ठरल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आंदोलनाला आणि मागण्यांना वेग येणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.