OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’

Supporter of Chhagan Bhujbal Commits Suicide in Akola District : भुजबळांच्या समर्थकाची अकोला जिल्ह्यात आत्महत्या

Akola ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये’, ‘जातीय जनगणना झाली पाहिजे’ आणि ‘आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही’ अशा भावनिक शब्दांत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे शेतकरी विजय बोचरे (वय ५९, रा. आलेगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात ही घटना घडली आहे.

कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बोचरे यांनी मृत्यूपूर्वी समाजातील असुरक्षिततेबद्दल आपल्या मोबाईलवर तीन भावनिक स्टेटस पोस्ट केले होते. पहाटे अडीचच्या सुमारास हे संदेश टाकल्यानंतर काही वेळातच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष : ठाकरे गटाचा ‘हंबरडा’!

त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटले आहे :

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

आमच्या मुलाबाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे.

“जय ओबीसी, जय संविधान.”
तसेच, “जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये,” असे आवाहन त्यांनी स्पष्ट शब्दांत केले होते.

Yuvak Congress : युवक काँग्रेसची ‘आय लव्ह आंबेडकर’ मोहीम!

घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहेत.

विजय बोचरे यांच्या आत्महत्येमुळे आलेगावसह संपूर्ण पातूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बोचरे हे मेहनती शेतकरी असून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सदैव पुढाकार घेणारे कार्यकर्ते होते. त्यांचे समाजप्रेम आणि न्यायासाठीचे भान अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या मृत्यूने आलेगाव हादरले आहे.