Officers scolding : पैसा तुमच्या बापाचा नाही… माज दाखवू नको !

Rohit Pawar reprimands angry officer in General Assembly : रोहित पवार आमसभेत संतप्त, अधिकाऱ्याला सुनावले

Ahilyanagar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार पुन्हा संतापाच्या भरात आले. “पैसा तुमच्या बापाचा नाही… माज दाखवू नको!” असे कठोर शब्द वापरत त्यांनी जामखेडमधील एका अधिकाऱ्याला सणसणीत सुनावले. त्यांच्या या संतापामुळे एकीकडे नागरिकांनी टाळ्या वाजवत कौतुक केले तर दुसरीकडे विरोधकांनी यावरून टीका सुरू केली आहे.

कर्जत आणि जामखेड येथे रोहित पवारांनी सलग आठ तास आमसभा घेऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. दुपारी 12 तया बैठकीत प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदारांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनेक समस्या जागेवरच सोडवण्याचे निर्देश पवारांनी दिले.

Chandrashekhar Bawankule : महाजेनको आणि एनएमआरडीए एकत्र आल्याने शाश्वत विकासाला चालना !

एका नागरिकाने निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत तक्रार केली. अधिकारी मात्र फोटो किती जुने आहेत, आपण जाऊन पाहणी करू असे सांगत वेळ मारून नेऊ लागला. याच वेळी रोहित पवारांचा पारा चढला.

“हे लोक खोटं बोलतायत का? खिश्यातून हात काढ आधी… लै शहाणा काम करतोस का? मिजास दाखवू नकोस. हा पैसा तुमच्या बापाचा नाही, हा लोकांचा पैसा आहे. काम निकृष्ट झालंय हे समोर दिसतंय. उद्या करू, बघू असं सांगू नका. लोकांना पुढची 30-35 वर्षे त्रास सहन करावा लागतो. तुमचे पराक्रम आम्हाला ठाऊक आहेत!” असे कडक शब्दात पवारांनी अधिकाऱ्याला सुनावला.

नागरिकांनी रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेचं समर्थन करत “अधिकाऱ्यांना अशीच भाषा कळते” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक प्रलंबित कामे जागेवरच मार्गी लावल्याने त्यांचे कौतुक झाले.

मात्र विरोधकांनी टीका करत म्हटलं, “नागरिकांच्या अडचणी सोडवणे हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे. पण त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी अशा शब्दांत बोलणं योग्य नाही.”

Reservation controversy : जितका मराठ्यांना त्रास द्याल तितकं खोलात घुसू !

रोहित पवारांच्या या आक्रमक शैलीमुळे मतदारसंघात चर्चा रंगल्या असून, “अधिकाऱ्यांना जाब विचारणारा आमदार” अशी त्यांची प्रतिमा ठळक झाली आहे.