Mahagenco-NMRDA Partnership to Drive Sustainable Development : शाश्वत पर्यटन विकासासाठी शासनाचा पुढाकार
Nagpur : महायुती सरकारच्या काळात विदर्भाच्या विकासाला चांगली चालना मिळत आहे. उपराजधानीत एक ना अनेक विकास कामे सुरू आहेत. नुकताच महाजेनको आणि नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण NMRDA यांच्यामध्ये शाश्वत पर्यटन विकास प्रकल्पासाठी सामंजस्य करार झाला आहे. आता महाजेनको आणि एनएमआरडीए एकत्र आल्याने नागपूरचा कायापालट होणार आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महाजेनको आणि एनएमआरडीए यांच्यात झालेल्या करारानुसार २३२.१७ हेक्टर जमीन एनएमआरडीएला दिली आहे. जी जमीन कोराडी, महादुला, खापरखेडा, कामठी तालुक्यातील नांदा आणि नागपूर ग्रामीणमधील घोगली परिसरात आहे. या भागात आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यंटन केंद्र उभारले जाणार आहे.
Bachu Kadu : बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा : “आता थेट कलेक्टरलाच तोडू”
या कराराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव अश्विनी भिडे, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. आणि एनएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मिना उपस्थित होते.
प्रकल्पासाठी जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहे. वार्षीक भाडे एक रुपया असणार आहे. आवश्यकतेनुसार भाडेपट्टीचा कालावधी वाढवता येईल. महाजेनको आपले ऊर्जा निर्मिती केंद्र व सांडपाणी प्रक्रिया केंद्र यावर नियंत्रण राखून ठेवले जाणार आहे. तलावाच्या पाण्याचा पृष्ठभाग शाश्वत पर्यंटन प्रकल्पासाठी वापरण्याा विशेष हक्क एनएमआरडीएला देण्यात आला असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.








