Breaking

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर दीर्घकाळ चालले असते तर इतिहास वेगळा असता

Congress conducted Tiranga Yatra in Lonar : लोणारमध्ये तिरंगा यात्रेद्वारे जवानांच्या शौर्याला मानवंदना

Buldhana “जर ऑपरेशन सिंदूर अधिक काळ राबविण्यात आले असते, तर आज पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता,” अशी ठाम भावना माजी सैनिकांनी येथे काँग्रेसच्या तिरंगा यात्रेदरम्यान व्यक्त केली. केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ लवकर थांबवल्याचे त्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच भविष्यात पाकिस्तानने शिस्त राखली नाही, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.

राजीव गांधी यांची जयंती आणि ‘सद्भावना दिवस’ या निमित्त २१ मे रोजी लोणार येथे काँग्रेसतर्फे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये विविध स्तरांतील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

Vidarbha Farmers : पाच महिने थकीत; शेतकऱ्यांचा संयम संपला, कारखान्यावर आंदोलन

कार्यक्रमात काँग्रेसतर्फे माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माजी सैनिकांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी मोहीम नव्हती, तर तो देशाच्या स्वाभिमानाचा भाग होता. ती कारवाई लवकर थांबवणे योग्य निर्णय नव्हता.”
यात्रेदरम्यान देशाच्या नौदल, वायुदल आणि भूदल यांनी अलीकडे केलेल्या शौर्याचे गौरव करण्यात आले. उपस्थितांनी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Malkapur administration : रमाई घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत रेती

कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते शांतीलाल गुगलिया, पक्ष निरीक्षक वसंतराव देशमुख, साहेबराव पाटोळे, तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शेख समद, अनिकेत मापारी, शेख रऊफ, नितीन शिंदे, पांढरी चाटे, केशवराव फुके, ज्ञानेश्वर चिभडे, शेख अस्लम, प्रा. सुदाम कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा शांततेत, राष्ट्रभक्तीने भारलेल्या वातावरणात पार पडली. “देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या पाठीशी आपण उभे आहोत,” हा संदेश या तिरंगा यात्रेद्वारे दिला गेला.