व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Oracle company: १२ हजार भारतीयांना नोकरीवरून काढलं, पहाटे पाच वाजता पाठवला ईमेल

Oracle company: १२ हजार भारतीयांना नोकरीवरून काढलं, पहाटे पाच वाजता पाठवला ईमेल

12 thousand Indian employees terminated by Oracle company : ओरॅकल कंपनीकडून नोकरकपात; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Mumbai ओरॅकल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आली असून जवळपास १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे. यासोबत त्यांना टर्मिनेशन लेटरही देण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांत आणखी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणताही पूर्वसुचना न देता कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तयारीची संधीही मिळाली नाही. काहींनी सांगितले की, कंपनीमध्ये आधीपासून नोकरकपातीची चर्चा होती, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याची अपेक्षा नव्हती.

Legislative Council election : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मुंबई वारी, जोरदार लॉबिंग

काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. एकाने लिहिले, “२० वर्षांच्या सेवेनंतर पहाटे ५ वाजता नोकरीवरून कमी करण्यात येत असल्याचा ईमेल आला.” दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “पहाटे ६ वाजता ईमेल आला, पुढच्या महिन्यात माझी ४ वर्षे पूर्ण होणार होती. पण आता कंपनीने मला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घेतला”

Lonar Lake : लोणार सरोवर वाचविण्यासाठी ‘वॉटर लिफ्टिंग’ला राज्याची मंजुरी; केंद्राच्या शिक्क्याची प्रतीक्षा

दरम्यान, कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीत बदल करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. या बदलांमुळे काही पदे आता आवश्यक राहिलेली नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही नमूद करण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, त्यांना दोन महिन्यांचे अतिरिक्त वेतन देण्यात येणार असल्याच कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

error: Content is protected !!