Panchayat Samiti Office : बिडीओ कार्यालयात नव्हते, ग्रामस्थांनी खुर्चीलाच हार घातला!

The BDO was absent from the office, so the villagers garlanded his chair : वरखेड बु. येथील ग्रामसेवक निलंबनासाठी ग्रामस्थांचे डफडे बजाव आंदोलन

Shegao तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील ग्रामसेवक राजू गावंडे यांच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा रोष शिगेला पोहोचला आहे. ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करत ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी केली.

यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे मोर्चा काढून निलंबनाची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर केवळ बदली आदेश निघाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.

Water crisis : रस्ता व पाणीप्रश्नावर बेलुरा ग्रामस्थांचा हंडा बजाव आंदोलन

१८ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसभा तहकूब करण्यात आली असतानाही ग्रामसेवक गावंडे यांनी स्वतःहून बनावट ठराव तयार करून मंजूर दाखवला. हा ठराव आजही शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असून, त्यातील कोणताही मुद्दा ग्रामस्थांच्या हिताचा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, अधिकृत ग्रामसभेची नोटीस वेळेत न देता चुकीची दिनांक दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

२८ ऑगस्ट रोजीच्या तहकूब ग्रामसभेत ग्रामस्थांनी खरी ग्रामसभा घ्यावी अशी मागणी केली असतानाही, ग्रामसेवकाने अध्यक्षांचे आदेश न पाळता गावकऱ्यांचे प्रश्न चर्चेत घेतले नाहीत. त्यामुळे नियमभंग, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि ग्रामसभेचा अपमान अशा गंभीर तक्रारींवर कारवाईची मागणी तीव्र झाली.

मोर्चा येणार असल्याची माहिती असूनही शेगाव पंचायत समितीचे बीडीओ राजपूत अनुपस्थित होते. यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आणि ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत बिडीओच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला.

Reservation controversy : बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, १५ सप्टेंबरला महामोर्चा

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की, तातडीने कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन उभारले जाईल. अखेर दुपारी बीडीओ राजपूत यांनी योग्य कारवाईचे आश्वासन लेखी स्वरूपात दिल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.