Pandit Vs Hake : मी पण क्षत्रिय, घोडा लावतो म्हणणाऱ्या ‘ स्ट्रीट डॉग’ ला गप्प बसवेन

Vijaysinh Pandits blunt attack on the Haake : विजयसिंह पंडितांचा हाकेंवर रोखठोक हल्लाबोल

Beed : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं असतानाच बीड जिल्ह्यात मात्र नेत्यांमधील उघड शाब्दिक युद्ध पेटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उघड पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता एकमेकांच्या उघड नालस्तीवर उतरले आहेत. हाके यांनी जरांगेंबरोबर पंडितांवर चढाओढीने टीका केली, तर विजयसिंह पंडितांनी थेट “हा स्ट्रीट डॉग आहे” अशी हिणकस उपमा देत हाके यांना चिरडलं आहे.

विजयसिंह पंडित एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले “गेल्या तीन दिवसांपासून हा बीडमध्ये आला आहे आणि मुद्दाम वातावरण कलुषीत करत आहे. आमदार आणि लोकप्रतिनिधींवर खालच्या पातळीची वक्तव्य करतो. माझ्या नावाचे बॅनर लावले म्हणून मला दंडुक्याने मारू, अशी भाषा वापरली. संविधानिक पदावर असताना मी संयम ठेवला. पण हा फार काळ चालणार नाही.”

Maratha movement : फडणवीसांनी अखेर चर्चेचं दार उघडलं !

“ओबीसींचा नेता? फक्त लाईमलाईटचा भिकारी!” असे म्हणत पंडितांनी टीका केली,”तो स्वतःला ओबीसींचा नेता म्हणवतो, पण त्याच्या नावावर ओबीसी समाज काहीही मान्य करत नाही. हा फक्त प्रसिद्धीचा भिकारी आहे. चार दिवसांपूर्वीच त्याचा खरा चेहरा एका व्हिडिओत उघड झाला. मंत्री होण्याचे हास्यास्पद दावे करणारा हा फक्त गोंधळ घालण्यासाठीच भटकतो.”  हाकेंच्या सततच्या उचकावणीला कंटाळून पंडित म्हणाले “हा श्वान आहे, पण जातीवंत नाही… हा स्ट्रीट डॉग आहे! असं मोकाट फिरतो आणि सगळ्यांवर घाण उडवतो. मी पण क्षत्रिय आहे, घोडा लावतो. तो काट्या घेऊन आला, दंड थोपटला, लोकांना भडकवलं. जर मी कार्यकर्त्यांना सांगितलं असतं, तर तो बीड जिल्ह्यातून परत गेला नसता. पण मी माझ्या संविधानिक जबाबदारीमुळे संयम दाखवला.”

Sanjay Sawkare : पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव !

हाकेंच्या भडकावणीमुळे काही कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडितांचा पुतळा जाळला. यावर पंडित म्हणाले
“माझ्या पुतळ्याचं दहन झालं, पण मी शांत राहिलो. कारण माझं लक्ष जरांगे यांच्या आंदोलनावर आहे. मात्र, सतत खालच्या भाषेत बोलून तो वातावरण चिघळवतो. हे स्पष्ट षडयंत्र आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला अडथळा आणण्यासाठी हा प्रकार केला जातोय.” “बीड जिल्ह्याचं नाव चुकीच्या कारणांनी राज्यभर बदनाम होतंय. अजित पवार हे पालकमंत्री आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी संयम बाळगला. पण काळ जर सोकावला, तर त्याला पायबंद लावण्याची ताकद माझ्यात आहे. गरज पडल्यास त्याला थांबवण्याची ताकद माझ्या हातात आहे,” असा स्पष्ट इशारा पंडितांनी दिला.

Aapala Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल आता अधिक सुलभ होणार !

हा वाद फक्त बॅनरवर सुरू झाला, पण आता मराठा विरुद्ध ओबीसी, स्थानिक राजकारणातील सत्ता संघर्ष आणि व्यक्तिगत अहंकार या तिन्ही गोष्टींचा स्फोटक संगम झाला आहे. जरांगे आंदोलनाभोवती आधीच सरकार, विरोधक आणि ओबीसी नेते एकमेकांवर धावून जात असताना, आता हा शाब्दिक स्फोट आंदोलनाला नवा राजकीय ट्विस्ट देतो आहे.
लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्यातील जुना राजकीय आकडेमोड आता थेट वैयक्तिक स्तरावर पोहोचला आहे. “मी पण क्षत्रिय” म्हणत पंडितांनी हाके यांना उघडपणे आव्हान दिलं आहे. या घडामोडीमुळे बीड जिल्हा पुन्हा राज्याच्या राजकीय नकाशावर वादग्रस्त पद्धतीनं झळकतो आहे.

_____