650 officers in the Animal Husbandry Department will be transferred through counseling : बदलीसाठी उपलब्ध पदांची यादी पशुसंवर्धन संकेतस्थळावर
Mumbai : पशुसंवर्धन विभागात रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. बदलीपात्र अधिकाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भागांत मनुष्यबळाचा समतोल साधण्यासाठी पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील प्राधान्याने भरायची पदे निश्चित करण्यात आली आहेत. विभागातील ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात येणार आहेत. हा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला.
बदलीपात्र अधिकाऱ्यांची वर्गवारीनिहाय ज्येष्ठता यादी व बदलीसाठी उपलब्ध पदांची यादी पशुसंवर्धन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची लिंक सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वर्गवारीतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बदलीचे ठिकाण निवडण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
Vanchit bahujam aghadi : शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणात रस उरलेला नाही का?
समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबवताना ती पारदर्षकपणे पार पाडली जाईल, याचीही दक्षता घेण्याच्या सुचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. बदलीसाठी निर्धारित करण्यात आलेली पदे, दिव्यांग, गंभीर आजार असलेले कर्मचारी, असक्षम पाल्य, विधवा किंवा परित्यक्त्या, पती – पत्नी एकत्रिकरण अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, त्या शेतकऱ्यांना वीज बिलात सलवत नाही
समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही १५ व १५ मे २०२५ रोजी आयुक्त पशुसंवर्धन पुणे येथे करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान सुमारे ६५० अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना केल्यानंतर काही नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकत्रित पशुसंवर्धन विभागांतर्गत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तीन हजार पेक्षा जास्त पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले आहेत. नजिकच्या काळात ही पदे भरली जाण्याची शक्यता आहे.