No facts were found in the CBI investigation, closure report submitted : तपासामध्ये तथ्थ्य आढळले नाही, क्लोजर रिपोर्ट सादर
Mumbai : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अनिल देशमुख गृहमंत्री असताना एकाएकी चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपास केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणात परमबीर सिंग यांना क्लीन चीट दिली आहे.
परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे कोपरी आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्रपणे दाखल करण्यात आले होते. तक्रार झाल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. सीबाआयच्या तपासात परमबीर सिंग यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमध्ये तथ्थ्य आढळून आले नाही. त्यामुळे क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला.
Neelam Gorhe : उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डकडून आमदाराला धक्काबुक्की !
परमबीर सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील १९८८च्या तुकडीतील आहेत. त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र होमगार्डचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केल्यानंतर ते फरार झाले होते. तेव्हा मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषीत केले होते. पण आता सीबीआयने क्लीन चीट दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : अधिवेशन संपल्यावर होणार ‘त्या’ शिक्षकांचा पगार !
परबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय चांगलाच तापला होता. काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यामुळे ही घटना तेव्हा फार महत्वाची ठरली होती.