Maharashtra government clamps down on social media use by government employees : आता करता येणार नाही स्वयंप्रशंसा करणाऱ्या पोस्ट
Mumbai : सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या सोशल मिडिया हॅन्डल्सवरून रिल्स आणि पोस्ट व्हायरल करत होते. यामध्ये स्वतःच्या बढाया मारण्याची कामे होत होती आणि सरकारी मालमत्तेचाही गैरवापर होत होता. सर्वप्रथम भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी याविरोधात आवाज उठवला. सोशल मिडियाचा असा वापर बंद झाला पाहिजे, यासाठी त्यांनी यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आवाज उठवला होता या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी याचा पाठपुरावा केला. यासंदर्भात सुधारित सुचना देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले होते.
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शासकीय मालमत्तेचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी होऊ नये आणि कामकाजात सुसूत्रता यावी, यासाठी आमदार फुके यांनी मोठा लढा दिला. आज त्यांच्या लढ्याला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने आज (२८ जुलै) शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये सोशल मिडियाच्या वापराबाबत काही सुचना लागू करण्यात आल्या आहेत.
Uddhav Balasaheb Thackeray : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून केले आंदोलन!
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने, बाह्यस्त्रोतांद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या सुचना लागू राहतील. राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर किंवा कृतीवर टीका करू नये, ही परिपत्रकातील पहिली सुचना आहे.
Irregularities in solar project : सौर प्रकल्प घोटाळा प्रकरणाला राजकीय वळण?
शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मिडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा. शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मिडिया खाते दोन्ही स्वतंत्र ठेवावे. केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट, अॅपचा वापर करू नये. शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचाच वापर करता येईल.
Vijay Wadettiwar : टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट !
कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वय, संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. शासनाच्या, विभागाच्या योजना, उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मिडियावर मजकूर लिहिता येईल. मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, यांसह एकूण १४ सुचना परिपत्रकातून देण्यात आलेल्या आहेत. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्याकडून या मार्गदर्शक सुचनांचा भंग होईल, त्याचेवर महाराष्ट्र नागरी व सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.








