Parth Pawar : पार्थ पवारांच्या करोडोच्या जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई !

Tehsildar, Deputy Registrar suspended, immediate orders from Chief Minister : तहसीलदार, उपनिबंधक निलंबित, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ आदेश

Pune : राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला पुण्यातील तब्बल 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आरोप होत आहे. आणखी धक्कादायक म्हणजे, या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टँप ड्युटी आकारण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित तहसीलदार आणि उपनिबंधकाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात प्रथमदर्शनी गंभीर अनियमितता झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही या व्यवहारातील गैरप्रकार आणि बेकायदेशीर नोंदणी केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं आहे.

Local Body Elections : काँग्रेस बंडखोरांना पुरस्कृत करत असेल तर आघाडी कशी टिकवायची ?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “जमीन व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. कुठेही गैरप्रकार झाला असेल तर कारवाई होणारच.” मुख्यमंत्र्यांनी सकाळी कारवाईचे संकेत दिल्यानंतर, केवळ दोन तासांतच निलंबनाचे आदेश देण्यात आले, ज्यामुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

ही जमीन पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याच्या 40 एकर जागेची असल्याचे समजते. प्राथमिक चौकशीत, या जागेचा व्यवहार बेकायदेशीर पद्धतीने केल्याचं आणि मूळ मालक व सरकारची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तपासात या गैरव्यवहाराची खात्री झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

Rupali Thombre Vs Chakankar : पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर !

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पार्थ पवार आणि अजित पवार यांची या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. राज्याच्या राजकारणात पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराने पुन्हा ‘सत्तेतील नातेसंबंध आणि व्यवहारांची पारदर्शकता’ या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

______