BJP MLA strong response to NCP’s allegations : राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजप आमदाराचे तीव्र प्रत्युत्तर
Mumbai: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपात प्रवेश देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
यावर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी थेट पत्र लिहित सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यांच्या विधानांमध्ये तथ्य नसल्याचा आरोप करीत राणाजगजितसिंह पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Shock to Hansraj Ahir : हंसराज अहीरांना एकामागून एक धक्के,नेतृत्वावर वाढता असमाधानाचा सूर
पाटील यांनी आपल्या पत्रात सुप्रिया सुळेंना उद्देशून लिहिले की, त्यांच्याविषयी केलेले आरोप चुकीची किंवा अपुरी माहितीच्या आधारावर किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केले गेले आहेत. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच गटात होते, हे कदाचित त्यांना माहित नसावे, असा दावा त्यांनी केला. आरोपींवर आरोप सिद्ध होईपर्यंत ते निरपराध मानले जातात, हा संविधानिक सिद्धांतही त्यांनी अधोरेखित केला. त्यांनी याच संदर्भात, गंभीर आरोप असतानाही काही मंत्र्यांना आपण मंत्रिमंडळात कायम ठेवले होते, याचीही सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष आठवण करून दिली.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणण्यासाठी ज्यांनी पोलिसांना सहकार्य केले, त्यांनाच आरोपी बनवण्यात आल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. स्थानिक महिलांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षकांना संदेश करून तपासाची मागणी केली होती, तसेच संबंधितांना स्थानिक गुन्हे शाखेशी जोडून दिले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. न्यायालयाने सहकार्य करणाऱ्यांचा जामीन मंजूर करताना त्यांची भूमिका मान्य केली असल्याचेही त्यांनी सांगितले. खरे गुन्हेगार कोण हे न्यायालयच ठरवेल, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले.
Pune land scam : पार्थ पवार निर्दोष, सब-रजिस्ट्रारसह तिघांवर जबाबदारी
मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असून तेरणा ट्रस्टने केवळ निविदेत सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले. याआधी दोन वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्या प्रयत्नात हा सहभाग झाल्याचा तपशील त्यांनी मांडला. यात नेमके चुकीचे काय झाले, असा सवालही त्यांनी सुप्रिया सुळेंना केला आहे.
Local Body Elections : तब्बल ३५ वर्षांनी सानंदा परिवार नगरपालिका निवडणुकीतून बाहेर
पत्राच्या शेवटी, अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे आपले नातेवाईक असल्याप्रमाणेच सुप्रिया सुळेही आपल्या थोरल्या बहिणीप्रमाणे जवळच्या आहेत, आणि त्यांचा आदर आपल्याला मनापासून आहे, असे पाटील यांनी नमूद केले. मात्र, चुकीची माहिती पसरवण्याआधी संवाद साधण्याची गरज होती, असे त्यांनी सांगत कोणतीही शंका असल्यास वस्तुनिष्ठ माहिती आणि पुरावे देण्यासाठी तयार असल्याचा प्रस्ताव ठेवला.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता सरळ भाजप–राष्ट्रवादी शरद पवार गट संघर्षात परिवर्तित झाला असून, पाटील यांच्या या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
_____








