The perverted counselor usurped the young woman’s land : प्रेयसीची २० एकर जमीन हडपली; पुन्हा अटक
Nagpur अनेक महिला-मुलींचे लैंगिक शोषण करणारा विकृत समुपदेशक विजय घायवट याचे आता नवनवे प्रताप पुढे येत आहे. एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिची २० एकर जमिनही हडपली. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत लग्नाचे नाटक केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
घायवट हा बलात्काराच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात बंद होता. त्याच्याविरुद्ध काही तरुणी, विवाहित महिलांसह अल्पवयीन मुलीसुद्धा त्यांचे लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारी देण्यासाठी समोर आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल होताच हुडकेश्वर पोलिसांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्याचा अर्ज केला. तो मंजूर झाल्याने पोलिसांनी घायवटला कारागृहातून अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
घायवट याने १५ वर्षांपूर्वी मानेवाडा मार्गावरील बाकडे सभागृहामागे स्वतःच्या घरात मनोविकास नावाने निवासी मानसोपचार केंद्र उघडले. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या शाळकरी मुली, तरुणी, विवाहित महिलांचे समुपदेशन सुरू केले. या मनोविकास केंद्राची शेजारी आणि नातेवाईकांनासुद्धा माहिती नव्हती. घराच्या दुसऱ्या माळ्यावर त्याने काही खोल्या काढल्या होत्या. तेथे तो मुलींच्या राहण्याची व्यवस्था करीत होता. त्याच्याकडे उपचार घेणाऱ्या मुली-तरुणींना घरातील सर्व कामे करावी लागत होती.
तसेच घायवटची कार मध्यरात्री मुली स्वच्छ करायच्या. मुलींना शेजाऱ्यांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच वरच्या माळ्यावरील काळा धंदा कुणालाच माहिती होऊ नये म्हणून घायवटने खबरदारी घेतली होती. एका मुलीचे आईवडील अपघातात मरण पावले.
महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकासाठी २०० कोटी मंजूर !
ती नैराश्यात असल्याने मनोविकास केंद्रात समुपदेशनासाठी आली. ती मुलगी श्रीमंत असल्याचे बघून घायवटने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती घायवटच्या प्रेमात आकंठ बुडाली. तिने स्वतःच्या नावावर वारसाहक्काने आलेली जमीन घायवटच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. आता त्या मुलीचे काका-काकू ती जमीन सोडविण्यासाठी घायवटशी लढा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विजय घायवटच्या लॅपटॉपमध्ये जवळपास दीडशेवर अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती आढळून आल्या. घायवट हा पत्नी व दोन्ही प्रेयसींच्या मदतीने इतर तरुणींवर लैंगिक अत्याचार करीत होता. टीव्ही-लॅपटॉपवर तरुणींना अश्लील चित्रफिती दाखविण्यात येत होत्या. घायवट लैंगिक अत्याचार करताना त्याची पत्नी भ्रमणध्वनीने चित्रफिती काढत होती, अशी माहिती आहे.








