Pimpri-Chinchwad municipal corporation : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा डंका; रवी लांडगे महापौर तर शर्मिला बाबर उपमहापौरपदी बिनविरोध

ravi-landge-elected-pcmc-mayor-uncontested : महापौरपदासाठी एकमेव अर्ज,राष्ट्रपती राजवट संपुष्टात

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, भाजपचे ज्येष्ठ नेते रवी लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. महापौरपदासाठी भाजपकडून केवळ रवी लांडगे यांचाच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

लांडगे हे भोसरी भागातील प्रभावशाली नेतृत्व असून, प्रभाग क्रमांक ६ मधून ते दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले होते. त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडला २७ वे महापौर लाभले आहेत.

महापौरपदापाठोपाठ उपमहापौरपदासाठीही भाजपच्या शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला होता.

Amravati Municipal Corporation : अमरावतीत महायुतीने काँग्रेसला रोखले, भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर

मात्र, नंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शर्मिला बाबर यांचा मार्ग मोकळा झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ सदस्यांच्या सभागृहात भाजपने ८४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ आणि शिवसेना (शिंदे गट) ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Nagpur Municipal Corporation : भाजपच्या नीता ठाकरे नागपूरच्या महापौर!

या नव्या नियुक्त्यांसोबतच पिंपरी-चिंचवडमधील प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिधींचा कारभार पुन्हा सुरू झाला आहे. रवी लांडगे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शहराच्या विविध विकासकामांत सक्रिय सहभाग घेतला आहे. आता महापौर म्हणून त्यांच्याकडून शहराच्या पाणीपुरवठा, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजनेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तर उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या माध्यमातून महिला कल्याण आणि आरोग्य क्षेत्रातील योजनांना गती मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या या एकहाती सत्तेमुळे आगामी काळात शहराच्या विकास प्रकल्पांना अधिक वेग मिळण्याचे संकेत मिळत आहेत.