Rural housing subsidy increased : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२मध्ये ५० हजारांची वाढ
Wardha प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घरकुल लाभार्थींना शहरीप्रमाणेच ग्रामीणलाही घरकुलासाठी दोन लाख ५० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी स्थानिक खासदारांनी Amar Kale संसदेत केली होती. त्याची दखल घेत शासनाने २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थींना देण्यात येणाऱ्या अनुदानात ५० हजारांची वाढ केली. यासंदर्भात शासन निर्णय काढल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला.
शहरी भागातील घरकुलाकरिता दोन लाख ५० हजार रुपये, तर ग्रामीण भागात केवळ एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. सिमेंट, रेती, विटा, लोखंड यांचे दर शहरी व ग्रामीणकरिता सारखेच आहेत. ग्रामीण भागात बांधकाम साहित्य नेण्याकरिता आणि मुजरांच्या उपलब्धतेकरिता शहरापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना इतक्या कमी अनुदानात घर बांधणे अशक्य होते.
त्यामुळे शहरीप्रमाणेच दोन लाख ५० हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी खासदार काळे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांनी संसदेमध्येही प्रश्न उपस्थित करून ग्रामीण घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत शासनाने अनुदानात ५० हजारांची वाढ केली. यामुळे घरकुल लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.
सर्वांच्या घराची स्वप्नपूर्ती व्हावी, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे; परंतु बऱ्याच वर्षांपासून शहराकरिता दोन लाख आणि ग्रामीण भागाकरिता एक लाख २० हजारांचेच अनुदान दिले जात होते. यात ग्रामीण भागातील लाभार्थींना घर बांधणे अशक्य होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत खासदार अमर काळे यांनी हा मुद्दा संसदेत रेटून धरला. परिणामी शासनाने आदेश काढून ५० हजार रुपयांचे अनुदान वाढविले. त्यामुळे सर्वच लाभार्थींना दिलासा मिळाला.








