PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचा संशय?

12,000 farmers left out of the scheme in Buldhana : बुलढाण्यात १२ हजार शेतकरी योजनाबाहेर; सरकारच्या नवीन फिल्टरवर प्रश्नचिन्ह

Buldhana शेतकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेली केंद्र सरकारची महत्वाकांक्षी ‘पीएम किसान सन्मान योजना’ पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला वितरित होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात तब्बल १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकरी आणि विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

२० व्या हप्त्यानंतर केंद्र सरकारने लागू केलेल्या कडक फिल्टर, भू-नोंदींची तपशीलवार छाननी आणि अनिवार्य ई-केवायसी यांच्या अटींमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना हप्ता मिळणे थांबल्याने ग्रामपातळीवर नाराजी व्यक्त होत आहे.

Balwant Wankhede : अमरावती स्टेशन स्थलांतराचा मुद्दा संसदेत!

केंद्राची ‘एक कुटुंब – एक लाभार्थी’ ही नवी भूमिका लागू झाल्यानंतर एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना मिळणारा लाभ बंद झाला आहे. यामुळे अनेक कुटुंबांतील लाभार्थी अपात्र ठरले असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अनेक प्रकरणांत दाम्पत्याच्या संयुक्त मालकीची जमीन असतानाही लाभ केवळ पत्नीलाच देण्यात येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून येत आहे. आधार लिंकिंग, भूमिअभिलेख अपडेट आणि नव्या तांत्रिक फिल्टर्समुळे शेतकऱ्यांचे नाव अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

लाभार्थी वगळण्यामागे पारदर्शकता की प्रशासनाचा गोंधळ यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यंत्रणांकडून होणारी पडताळणी अत्यंत कठोर असल्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिक राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

OBC Reservation : हिवाळी अधिवेशन संपताच जंतर–मंतरवर धडकणार ओबीसी !

योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातात. मात्र नव्या तांत्रिक अटींमुळे लाभार्थ्यांची संख्या अचानक घटल्याने हा निधी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोचतो, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.