PM Modi makes big allegations against Congress in special debate : पंतप्रधान मोदींचे विशेष चर्चेत काँग्रेसवर मोठे आरोप
Delhi: वंदे मातरम् या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने आज लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र स्वरात आरोपांची सरबत्ती केली. वंदे मातरम् हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा ऊर्जा स्त्रोत असून, 150 वर्षांच्या गौरवमय प्रवासाचे स्मरण हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असल्याचे म्हणताना, “हा तोच मंत्र आहे ज्याने 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. 150 वर्षांचा हा महान अध्याय देशाने आणि सभागृहाने सोडू नये,” असे मोदी म्हणाले.
मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले की वंदे मातरम् चा 150 वर्षांचा प्रवास हा संघर्ष, त्याग आणि तपस्येचा प्रवास आहे. “वंदे मातरम् ला 50 वर्षं होताना देश गुलामीत अडकला होता. 100 वर्षं पूर्ण होताना देशात आणीबाणी लादली गेली होती. ज्या गीताने देशाला स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले, त्याच गीताचा आवाज दाबला गेला, देशभक्त जनांना तुरुंगात डांबण्यात आले,” असा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
MSRTC : बनावट ओळखपत्रांवर लुटल्या सवलती, ८० प्रवाशांवर कारवाई
पंतप्रधान मोदींनी पुढे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील संबंधावर तीव्र टीका करत म्हटले, “काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले. इतिहास याचा साक्षीदार आहे. मागच्या पिढीत वंदे मातरम् वर भयानक अन्याय झाला. तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस झुकली आणि वंदे मातरम् चा विश्वासघात झाला.”
soybean procurement process : हमीभाव दराने सोयाबीन खरेदी नावापुरती
मोदींनी जिन्ना आणि नेहरू यांच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख करत काँग्रेसवर थेट आरोप केला. “1937 मध्ये जिन्नाने वंदे मातरम् ला विरोध केला आणि त्या क्षणापासून मुस्लिम लीगचे राजकारण प्रखर झाले. नेहरूंनी मुस्लिम लीगची निंदा करण्याचे टाळले, कारण जिन्नाच्या विरोधानंतर त्यांना स्वतःच्या खुर्चीला धोका वाटला. वंदे मातरम् च्या काही शब्दांवर मुस्लिमांना आक्षेप असल्याचे सांगत काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला आणि वंदे मातरम् चे तुकडे केले,” असे मोदी म्हणाले.
या चर्चेचा शेवट करताना त्यांनी देशाच्या जनतेवर आणि प्रतिनिधींवर वंदे मातरम् कर्ज असल्याचे सांगितले. “देशावर जेव्हा संकट आलं तेव्हा वंदे मातरम् चा जयघोष झाला. आज 150 वर्षांच्या या ऐतिहासिक संधीवर देशाने एकत्र यावे, हा गौरव पुनर्स्थापित व्हावा, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
———-








