Insult to the Prime Minister’s late mother through AI : मोदींच्या दिवंगत मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह चित्रफित केल्याचे प्रकरण
Amravati एआयच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबाबत अवमानकारक चित्रफीत तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. यावरून भाजपने काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी राजदवर संस्कृतीहीनतेचा आरोप करत राजकमल चौकात तीव्र आंदोलन केले.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार, स्थानिक अध्यक्षा सुधा तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. “पंतप्रधानांच्या आईचा अपमान म्हणजे देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीचा अपमान आहे,” असे आंदोलनादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Vishwas Patil : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार!
पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर महिलांचा सतत अपमान केल्याचा आरोप करताना, “पंतप्रधानांच्या आईचा हयात असतानाही राजकारणाशी काही संबंध नव्हता. तरीसुद्धा घाणेरड्या मानसिकतेचे दर्शन घडवत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हे कृत्य केले,” अशी टीका केली.
Religious tension : औरंगजेब, इब्राहिम गाझी यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
या आंदोलनात भाजपचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शहर जिल्हा सरचिटणीस बादल कुलकर्णी, ललित समदुरकर, राधा कुरील, ॲड. प्रशांत देशपांडे, गंगा खारकर, सुरेखा लुंगारे, लता देशमुख, महिला आघाडी सरचिटणीस सविता भागवत, शीतल वाघमारे, जया माहोरे, जयश्री कुबडे, भारती गुहे, मिलिंद बांबल, लखन राज, अशोक नागवानी, राजू राजदेव, गजानन देशमुख, वनमाला सोनोने, संगीता बुरंगे, नूतन भुजाडे, रेखा भुतडा, अंजली पाठक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. राजकमल चौकात झालेल्या या आंदोलनावेळी भाजपच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.








