BJP’s ‘Vasti Chalo’ campaign begins : ‘वस्ती चलो’ अभियानातून सुरू झाला जनसंपर्क
Wardha स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पण, भाजपला निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवायला सुरुवात झाली आहे. वर्धा येथे अलीकडेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वस्ती चलो’ अभियानाला प्रारंभ झाला आहे. कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर झाल्या तरी तयारीत राहण्याचा हा खटाटोप असल्याचं बोललं जात आहे.
भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियान रविवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत प्रतापनगर येथे पार पडले. भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष निलेश किटे यांच्या नेतृत्वात शहरात अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा महामंत्री जयंत कावळे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी न. प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, प्रशांत बुर्ले, माजी नगरसेवक प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते.
सकाळी भोयर यांच्या उपस्थितीत प्रतापनगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, वयोश्री योजना व अन्य सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांची भेटी घेण्यात आल्या. यावेळी भोयर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेंद्र वैद्य, प्रदीप ठाकरे, रमेश महल्ले, माधव कोटस्थाने, दीपक जोशी यांच्या निवासस्थानी पालकमंत्री यांनी भेटी दिल्या.
Bhandara Education : शाळा संस्थापकांचे नातेवाईकच बनले मुख्याध्यापक!
तसेच श्रीनिवास कॉलोनी येथील शहरी वर्धिनी आरोग्य केंद्राला भेट देऊन डॉक्टर, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास बूथ प्रमुख मंगेश मांगलेकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री उपस्थित राहिले. यावेळी आर्वीचे आमदार सुमित वानखेडेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री भोयर यांनी नागरिकांशी संवाद साधला.
Vidarbha Farmers : मुख्यमंत्र्यांना देणार होते आत्महत्याग्रस्त गावातील माती
कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते. माजी नगरसेविका श्रेया देशमुख यांनी संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहराध्यक्ष नीलेश किटे, मंगेश मांगलेकर, सौरभ देशमुख, प्रदीप ठाकरे, गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, वर्धा सायकल क्लब, प्रतापनगर व राधानगर परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.








