Pasha Patels statement on Munde’s inheritance dispute : मुंडेंच्या वारसाच्या वादावरून पाशा पटेल यांचे वक्तव्य चर्चेत
Parli : “निजामालाही ७०० बायका होत्या, त्याला काय अर्थ आहे,” या वाक्याने भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या राजकीय वारसदाराच्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी केलेले हे वक्तव्य राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे.
गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यात “गोपीनाथ मुंडेंचा खरा वारस कोण?” या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल यांनी वादग्रस्त तुलना करून नवा अध्याय जोडला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मोर्चात धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा वारस म्हणून घोषित केल्यापासून या वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर महादेव जानकर, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि सारंगी महाजन यांनीही वारसाच्या विषयावर भाष्य केले होते.
Amol Mitkari : वडेट्टीवार, रोहित पवारांनी आपला मेंदू तपासून घ्यावा
परळीत आयोजित कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाशा पटेल म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांचा वारस कोण असा प्रश्न विचारला तर मी सांगतो, एक मुलगी आहे आणि एक पुतण्या आहे. पंकजा आणि धनंजय हेच खरे वारसदार आहेत.” मात्र महादेव जानकर यांनी स्वतःला “चौथ्या क्रमांकाचा वारसदार” म्हणून घोषित केल्यावर पाशा पटेल यांनी उपरोधाने प्रत्युत्तर दिले “असे तर निजामालाही ७०० बायका होत्या, त्याला काय अर्थ आहे?” या विधानाने हशा पिकला तरी राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल यांनी अशा प्रकारची तुलना केल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महादेव जानकर यांनी भगवान गडावरून “पंकजा मुंडेच वारस आहेत” असा दावा केला होता, तर पंकजा मुंडे यांच्या गटानेही त्यांच्या नेतृत्वावर ठाम भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत पाशा पटेल यांच्या ‘निजाम’ टिप्पणीने भाजपसाठी अडचणीचे वातावरण निर्माण केले आहे.
Maharashtra politics : महायुतीच्या एक वर्षात फुटकी कवडीही मिळाली नाही !
दरम्यान, पाशा पटेल यांनी याच कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही महत्त्वाचे संकेत दिले. ते म्हणाले, “कर्जमाफी ही लोकप्रिय मागणी असली तरी सध्या तिजोरीची स्थिती पाहता तातडीने कर्जमाफी करणे शक्य नाही. अतिवृष्टीमुळे ३२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत, त्यामुळे सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.” तसेच परळी येथील औष्णिक वीज केंद्राच्या ५०० एकर जागेवर बांबू लागवडीचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा
गोपीनाथ मुंडेंच्या वारसाच्या वादाने बीड जिल्ह्याचे आणि राज्याचे राजकारण चांगलेच तापवले आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यापासून सुरू झालेला हा वाद आता भाजप नेत्यांच्या ‘निजाम’ तुलना पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या विधानावर भाजप काय भूमिका घेते, आणि मुंडे परिवाराकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_______








