Political controversy : ‘जनाची नाही तर मनाची तरी ठेवा’, अजित पवारांवरच घसरले विखे-पाटील!

Radhakrishna Vikhe Patils response while criticizing Sharad Pawar : शरद पवारांवर टीका करताना मित्र पक्षाच्या नेत्याला केले लक्ष्य

Dharashiv : जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत असतानाच विखे पाटील यांनी अजित पवारांनाही लक्ष्य केले. “अजित पवार, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा,” असा तिखट सल्ला त्यांनी दिला.

धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांना संबोधित करताना विखे पाटील यांनी साखर उद्योग आणि इथेनॉल धोरणावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून साखर कारखानदारीला जीवनदान दिले, मात्र त्या जीवनदान देणाऱ्या नेत्यांचे फोटो किंवा अभिनंदनाचे बॅनर अजित पवारांच्या कारखान्यांवर लावले जात नाहीत. “ज्यांनी आपल्याला जीवनदान दिलं, त्यांचं अभिनंदन न करणं ही कृतघ्नता आहे,” असे ते म्हणाले.

Cabinet meeting : 15 हजार पोलिस भरतीसह चार महत्त्वाचे निर्णय

शरद पवार यांच्यावर हल्ला करताना विखे पाटील म्हणाले, “जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आतापर्यंत लोकांच्या घरात फोडाफोडीचे राजकारण केले. लोकांना उपाशी ठेवण्याचे पाप त्यांच्या हातून झाले आहे.” याच भाषणात त्यांनी अजित पवारांवर टिका करत, “जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी,” असा पुनरुच्चार केला.

विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योग वाचला आहे आणि याचा थेट फायदा कारखानदारांना झाला आहे. तरीसुद्धा अजित पवारांनी आपल्या राजकीय सोयीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या योगदानाचा उल्लेख टाळल्याचा आरोप त्यांनी केला.

Bhaskar Jadhav : ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री; राजकीय कारकीर्द संपली तरी हरकत नाही !

या वक्तव्यामुळे महायुतीतच राजकीय कल्लोळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सत्तेत असूनही भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील मतभेद पुन्हा उफाळून येण्याचे संकेत विखे पाटील यांच्या या भाषणातून मिळत आहेत.