Pawer Vs pawer ; दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसू नये !

Ajit Pawars nephew Rohit Pawar gets harsh reprimand : अजितदादांचा पुतण्या रोहित पवारांना खोचक टोला

Kolhapur : “काही जणांना वाटतं आपण लईच मोठं झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व यांच्याकडेच आहे! त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पुतण्या रोहित पवार यांना थेट टोला लगावला. पत्रकार परिषदेत अजितदादांनी हे स्पष्ट विधान करताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पार्श्वभूमी अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच अजितदादांच्या गटावर सडकून टीका केली होती. विशेषतः सूरज चव्हाण यांच्या वादग्रस्त नियुक्तीवर रोहित पवारांनी तिखट शब्दांत सवाल उपस्थित केले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘पक्ष हायजॅक’ केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
या बोचऱ्या टीकेला अजित पवारांनी स्पष्टपणे सुनावले की, ज्यांना वाटतं ते महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांनी स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावं. आम्हाला आमच्या पक्षाचं बघता येतं. यामध्ये अजितदादांनी रोहित पवारांवर थेट नामोल्लेख न करता खोचक शब्दांत घाव घातला.

Ladki bahan Yojana ; पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही !

लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना युवक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण अवघ्या 20 दिवसांतच त्यांची थेट प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती सुनील तटकरे यांनी केली असली तरी अजित पवारांनी ‘ मला याबाबत माहितीच नाही’ असं विधान केल्याने आणखी संभ्रम वाढला.  रोहित पवारांनी याच मुद्द्यावर अजितदादांना लक्ष्य केलं होतं. त्यांनी ट्विट करत सूरज चव्हाण यांची नियुक्ती म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असल्याचं टोमणं मारलं. तसेच, “मारहाणीत ज्याचा हात फ्रॅक्चर झाला त्याचं प्लास्टर निघण्याआधीच प्रमोशन झालं, याला काय म्हणायचं?” असा खोचक सवालही त्यांनी केला होता.

Ravikant Tupkar : ‘शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा’, रविकांत तुपकर आक्रमक

याचवेळी अजित पवारांनी महायुतीबाबत बोलताना म्हटलं की, महायुतीमधील सर्वच घटक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात गैर नाही. विरोधकही तसंच करत आहेत. त्यामुळेच आम्ही राज्यभर कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहोत. सांगलीत झालेल्या मेळाव्यानंतर 25 ऑगस्टला कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे राष्ट्रवादीतील फुटीचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हं आहेत. अजितदादांच्या थेट इशाऱ्याने रोहित पवारांवर दडपण आलं असलं तरी, त्यांची आक्रमक भूमिका कायम राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

____