Breaking

Pradhan Mantri Awas Yojana : सामान्यांना दोन खोल्यांच्या घराची अपेक्षा, कामे पूर्ण करा !

Chandrashekhar Bawankule angered the officials : विभाग प्रमुखांना वेळेत कामे पू्र्ण करण्याचे निर्देश

Nagpur : गावठाण व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी शासनाची समान न्यायाची भूमिका आहे. घरकुलांसाठी शासन आग्रही आहे. त्यामुळे तेवढीच तत्परता संबंधित यंत्रणांनी दाखवली पाहिजे. घरकुलांच्या कामांत कोणत्याही प्रकारची आडकाठी टाकू नये. असे केल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची बैठक काल (ता. ७ जून) नागपुरात झाली. बेठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार संदीप जोशी, नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त संजय मीना, सहायत आयुक्त सचिन ढोले यांच्यासह एनएमआरडीेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणशी संबंधित अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे जनतेत नाराजीचा सूर आहे.

Sahitya Sammelan : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, घरकूल बांधकाम (प्रधानमंत्री आवास योजना), अमृत योजनेअंतर्गत पाणी व सिवेजलाईन, गुंठेवारी नागपुर महानगर पालिका क्षेत्र प्रकरणे, हुडकेश्वर नरसाळा येथील मुलभूत विकास कामे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नाले खोलीकरण या विषयावर आढावा बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Bachhu Kadu Hunger Strike: काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजनेबाबत पात्र लाभार्थ्यांना, ग्रामीण भागातील सरपंचांना परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. यादृष्टीने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व सरपंचाची कार्यशाळा लवकर आयोजित करण्यात यावी. यात या योजनेची माहिती देत जनजागृती करुन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात यावे. खरबी व तरोडी येथील पट्टेधारकांना पट्टे वाटप, गुंठेवारीची काम गतीने करणे तसेच पायाभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.