Ambedkar criticized the wavering attitude of OBC leaders : ओबीसी नेत्यांनी ‘स्वतःला प्रश्न विचारावा’, प्रामाणिकपणावर संशय
Akola ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रामाणिकतेचा आधार असणे आवश्यक आहे. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता हीच कळीची आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सकल ओबीसी समाजाच्यावतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शुक्रवारी सकाळी त्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आंबेडकर म्हणाले, “ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर माझी भूमिका धरसोड आहे का, हा प्रश्न प्रत्येक ओबीसी नेत्याने स्वतःला विचारला पाहिजे. आरक्षणाच्या ताटात वाटेकरी नको, गरीब मराठा समाजाचे वेगळे ताट आणि ओबीसींचे वेगळे ताट हवे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मात्र प्रामाणिकता नसेल तर कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही.”
Dattatray Bharane : शेती क्षेत्राच्या विकासासाठी ५ हजार कोटी, कृषीमंत्र्यांची घोषणा
ओबीसी समाज वेगळा घटक असून त्याचे प्रश्नही स्वतंत्र आहेत, याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे, असे ते म्हणाले. “आपण ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षणविरोधी असेल, तर आपण कितीही लढलो किंवा उपोषणे केली तरी प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाचा लढा हा केवळ समाजाच्या हितासाठी नव्हे, तर समाजात न्याय व समानता टिकवण्यासाठीही आवश्यक आहे. मात्र लोकशाही प्रक्रियेतूनच अधिकारांचे रक्षण होऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.”
Vijay Wadettiwar : बाहेर जी भूमिका मांडता, तीच बैठकीत मांडा ना..!
दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “मराठा समाज ईडब्ल्यूएस, मराठा आरक्षण, तसेच कुणबीमार्फत आरक्षण घेतोय; मग इतरांनी कुठे जायचे? हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे सुप्रीम कोर्टाने आधीच नमूद केले आहे. उलट तो पुढारलेला समाज आहे. त्यामुळे काही अभ्यासू व्यक्तींनी या वास्तवावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.”