Breaking

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची ‘चलो बोधगया’ हाक!

Preparations for the battle for the liberation of Bodh Gaya : बुद्धगया मुक्तीसाठी निर्णायक लढ्याची तयारी; १६-१७ एप्रिलला लाखो कार्यकर्त्यांसह बोधगयेत आंदोलन

Akola बिहारमधील बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ असलेल्या बोधगया महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवसंजीवनी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या लढ्यात उडी घेत ‘चलो बोधगया’ अशी हाक दिली आहे. १६ व १७ एप्रिल रोजी स्वतः बुद्धगयाला जाऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

या आंदोलनाचा उद्देश बोधगया महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देणे हा आहे. सध्या या पवित्र स्थळाचा व्यवस्थापनावर हिंदू धर्मगुरूंचा वर्चस्व असल्याचा आरोप बौद्ध संघटनांकडून होत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या दीर्घ आंदोलनाला प्रथमच एका प्रमुख राजकीय पक्षाचे खुले समर्थन मिळाले आहे.

Nitin Gadkari : गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकर यांनीही तब्येत बरी नसताना मुंबईत पार पडलेल्या मोर्चात सहभाग घेत या आंदोलनाला आंबेडकर कुटुंबाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारामुळे देशभरातील आंबेडकरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोला जिल्ह्यातून सुमारे १० हजार कार्यकर्ते, तसेच बुलढाणा आणि वाशिम येथूनही हजारो कार्यकर्ते बिहारमधील बोधगयासाठी रवाना होण्याच्या तयारीत आहेत. वंचित आघाडीच्या स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांना नियोजनबद्धपणे समन्वय साधून नेण्यात येणार आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर

अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की, “जोपर्यंत महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही.” या निर्णायक टप्प्यावर त्यांनी सर्व समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर १६ आणि १७ एप्रिलला बिहारमध्ये मोठा जनआंदोलनाचा एल्गार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.